Thursday, May 28, 2026
Homeगडचिरोलीनक्षल चकमकीची दंडाधिकारी चौकशी; प्रत्यक्षदर्शींना २१ दिवसांत निवेदन सादर करण्याचे आवाहन..

नक्षल चकमकीची दंडाधिकारी चौकशी; प्रत्यक्षदर्शींना २१ दिवसांत निवेदन सादर करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पोलीस-नक्षल चकमकी दरम्यान सात पुरुष व पाच महिलांचे मृतदेह आढळून आल्याने घटनेतील मृत्यूची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९६ अन्वये दंडाधिकारी चौकशी करण्यात येणार आहे. सदरची घटना एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलीस स्टेशन,उपविभाग पेंढरी अंतर्गत येणाऱ्या  वंडोली गाव जंगल परिसरात १७ जुलै २०२४ रोजी झालेल्या पोलीस व नक्षलवादी चकमकीत सात पुरुष व पाच महिलांचे मृतदेह आढळून आले होते.
चौकशी प्रक्रियेसाठी प्रत्यक्षदर्शी व्यक्तींनी किंवा या घटनेविषयी माहिती असलेल्या नागरिकांनी स्वतःचे लेखी निवेदन,शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांच्यासमोर जाहीर सूचना प्रसिद्धी झाल्यापासून २१ दिवसांच्या आत किंवा तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.अन्यथा आक्षेप नसल्याचे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल,असे उपविभागीय दंडाधिकारी नमन गोयल यांनी स्पष्ट केले आहे.सदरच्या चौकशीमध्ये भाग घेणाऱ्यांनी घटनेचे वर्णन,स्वतःचा अनुभव,घटनेच्या आधी किंवा नंतर घडलेल्या संबंधित घटना,शासकीय किंवा अन्य यंत्रणांच्या प्रतिक्रिया,सहभाग व इतर संबंधित माहिती लेखी स्वरूपात सादर करावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता फेसबुक,इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या काही फीचर्स वापरासाठी मोजावे लागणार पैसे..

उद्रेक न्युज वृत्त :-आजच्या डिजिटल युगात फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप हे अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहेत.वैयक्तिक संवादापासून व्यवसाय,मार्केटिंग आणि मनोरंजनापर्यंत या प्लॅटफॉर्मचा...

शेतातील विहिरीत पडलेल्या वाघाच्या बछड्याला जीवदान..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील लोहारा शिवारात पांढर तलाव परिसरातील एका शेतातील विहिरीत वाघाचा बछडा पडल्याची वार्ता पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत...

दहा वर्षांपेक्षा जास्तकाळ कार्यरत असलेल्या इतर अनेक अभियंत्यांची यादी उपलब्ध असतांना केवळ मलाच लक्ष्य केले जाते.. – कोरचीतील नाडेकल पुलाशी संबंध नसल्याचा कार्यकारी अभियंता...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात भ्रष्टाचार,अनियमितता तसेच नाडेकल पुलाच्या बांधकामासंदर्भात माध्यमातून प्रसिद्ध आरोप निराधार असल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ चे कार्यकारी...

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!