Sunday, October 25, 2026
Homeगडचिरोलीनक्षली संघटनेला मोठा हादरा; जहाल नक्षलवादी सुरक्षा दलांच्या जाळ्यात..

नक्षली संघटनेला मोठा हादरा; जहाल नक्षलवादी सुरक्षा दलांच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नक्षल चळवळीतील शेवटचा सक्रिय सर्वोच्च नेता मिसिर बेसरा याची झारखंडच्या सारंडा जंगलात अन्नावाचून कोंडी झाल्याने मोजक्या नक्षलवाद्यांसह जंगलात भटकत असतांनाच त्याच्या अंगरक्षकासह एकूण २४ नक्षलवाद्यांनी सोमवार २७ जुलै २०२६ रोजी त्याची साथ सोडून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार,काल मंगळवार २८ जुलै रोजी दिवसाच्या सुरुवातीला सारंडा परिसरात २४ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करल्यानंतर गेल्या चार दशकांपासून पोलिसांना गुंगारा देणारा व तब्बल २.२० कोटी रुपयांचे बक्षीस असलेला जहाल नक्षलवादी मिसिर बेसरा याला झारखंडच्या गिरिडीह-धनबाद सीमेवरील मनियाडीह भागातून रात्रीच्या सुमारास सुरक्षा दलांनी बेड्या ठोकल्या.विशेष म्हणजे,मिसिर बेसरासह त्याचे दोन निकटवर्तीय मेहनत उर्फ मोचू आणि गौरव यांनाही एका टाटा मॅजिक वाहनातून जातांना ताब्यात घेण्यात आले.झारखंड,बिहार,ओडिशा आणि छत्तीसगड या चार राज्यांमध्ये बेसराविरुद्ध १५० पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.एनआयए(राष्ट्रीय तपास संस्था)देखील दोन प्रकरणांत त्याचा शोध घेत होती.त्याच्यावर झारखंड सरकारने १ कोटी रुपये आणि ओडिशा सरकारने १.२० कोटी रुपये असे एकूण २.२० कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.अटकेनंतर सुरक्षा दलाच्या पथकाने बेसरा आणि त्याच्या सहकाऱ्यांना तातडीने रांचीकडे रवाना केले.मूळचा पिरतांड येथील रहिवासी असलेला बेसरा धनबादमध्ये कॉलेज शिक्षण घेत असतांना सावकारविरोधी आंदोलनाच्या माध्यमातून नक्षलवादी चळवळीकडे आकर्षित झाला होता.सीपीआय (माओवादी)च्या सर्वोच्च ‘पॉलिटब्युरो’ समितीमध्ये उरलेला मिसिर बेसरा हा एकमेव सक्रिय सदस्य होता.गेल्या काही महिन्यांत शरण आलेल्या नक्षलवाद्यांकडून पोलिसांना बेसराच्या ठावठिकाण्याबद्दल महत्त्वपूर्ण धागेदोर मिळाले होते.मे महिन्यात त्याच्या पथकातील २७ सहकाऱ्यांनी आत्मसमर्पण केले होते,तर काल मंगळवारी आणखी २४ जण शरण आल्याने पोलिसांचा त्याच्यावरील फास अधिक आवळला गेला.यापूर्वी सप्टेंबर २००७ मध्ये त्याला खुंटी येथून अटक झाली होती; परंतु २००९ मध्ये लखीसराय न्यायालयावरील नक्षलवादी हल्ल्याचा फायदा घेऊन तो पळून गेला होता.त्यानंतर त्याने बुढा पहार,कोल्हान आणि सारंडाच्या जंगलांतून आपल्या हालचाली सुरू ठेवल्या होत्या.अश्यातच एकाच वेळी मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करल्याने कोल्हानव सारंडाच्या जंगलात सक्रिय असलेल्या मिसिर बेसराची ताकद अत्यंत क्षीण झाली.त्यातच,केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला मिसिर बेसराच्या हालचालींची अत्यंत अचूक माहिती मिळाली होती.तो आपल्या साथीदारांसह गिरिडीहच्या दिशेने प्रवास करत असल्याचे समजताच राज्य पोलीस मुख्यालय,केंद्रीय राखीव दल आणि झारखंड जग्वार्स यांनी मिळून एक विशेष रणनीती आखली आणि तब्बल ४० वर्षांपासून चकमा देणाऱ्या मिसिर बेसराला पकडण्यात यश आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! भाडेकरूच्या खोलीत आढळल्या लाखोंच्या बनावट नोटा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चक्क भाडेकरूच्या खोलीत लाखोंच्या बनावट नोटा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी...

आज चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा..

उद्रेक न्युज वृत्त :-धार्मिक श्रद्धा,कौटुंबिक स्नेह आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम असलेल्या शरद ऋतूच्या प्रसन्न वातावरणात चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा आज,रविवार २५...

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!