- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईसचा (IED) स्फोटात जिल्हा राखीव रक्षक (DRG) चा एक जवान जखमी झाला असल्याची घटना आज,रविवारी २४ नोव्हेंबर रोजी घडली.सुकमामधील रायगुडेम आणि तुमालपाड भागात हा स्फोट झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात जिल्हा राखीव रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तब्बल १० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.यावेळी घटनास्थळाहून शोध मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रेही जप्त करण्यात आली होती.
- Advertisement -