उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये शासन स्तरावरून मंजूर केली जातात.मात्र जिल्ह्याचा विकास काही होईना…! कारण की,बाहेर ठिकाणाहून येणारे ‘सब माल डब्बे मे’ असे करून पोबारा करीत असतात.असाच प्रकार हल्ली सामाजिक वनीकरण विभागामध्ये सुरू असल्याने देसाईगंज सामाजिक वनीकरण विभाग बनला ‘झोलबा पाटलाचा वाडा’…..असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
सामाजिक वनीकरण विभागा अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड म्हणजेच झाडे लावली जातात.जसे,मुख्य डांबरीकरण रस्त्याच्या कडेला,गावातील पांदन रस्ते,एखाद्या तलाव पाळीवर,शेतकऱ्यांच्या शेत बांधावर व इतर ठिकाणी वृक्ष लागवड म्हणजेच झाडे लावून; अशी झाडे जिवंत ठेवण्याची जबाबदारी सामाजिक वनीकरण विभागाची असते.त्यांचे मुख्य काम केवळ ‘झाडे लावा झाडे जगवा’ हे आहे.त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागास कोट्यवधी रुपये शासन स्तरावरून दिली जातात.मात्र शासन स्तरावरून दिला जाणारा निधी खरोखरच दिलेल्या कामांसाठी लावण्यात येतो काय?
देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजना व इतर योजने अंतर्गत तसेच हल्ली सुरू असलेल्या वृक्ष लागवडीच्या कामांवर मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी दिसून येत असूनही न दिसल्या सारखे करणे म्हणजे ‘सांबर गेला एकीकडे व वडा राहिला दुसरीकडे’ असे एसीच्या रूममध्ये बसणाऱ्या हॉटेल अधिकाऱ्याचे झाले आहे.
देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवडीच्या काही साईटचे अवलोकन व प्रत्यक्ष साईटवर रामटेके यांनी भेट दिले असता रोपवन साईटवर बोर्ड लावणे आवश्यक असता; त्याठिकाणी बोर्डच नाही,काही अंतरावर वृक्षेच नाही,जिवंत रोपांची टक्केवारी कमी असतांना जास्त दाखविणे,मोजमाप पुस्तिका प्रमाणित नाही,त्यावर वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नाही,मोजमाप पुस्तिका अपूर्ण लिहिण्यात आल्या,अंदाज पत्रकानुसर तरतूद नाही,शेणखत,रोपे वाहतुकीच्या निविदा मागविण्यात आल्या नाही,मजुर पुरवठा स्वतः करण्यात आला,आपल्याच घरची संस्था निवड केली व इतर असे अनेक गैरव्यवहार व भ्रष्टाचार करून करोडो रुपये गब्बन करून ‘गब्बर सिंगची’ भूमिका बजावण्यात आली आहे.तरीही ‘तो’ म्हणतो अहवाल येऊ द्या..! ‘अरे सर्वच तुझे आहे; तुझ पाशी तरीही तुला कळेना..! कां बनतोस येळा गबाड्या… त्यामुळे सामाजिक वनीकरणाचे गणित अजूनही कुणालाच कळलेले नसल्याने सध्या ‘नरम व नंतर गरम’ असा माहोल दिसून येणार आहे.त्यामुळे ‘लोक सेवकांनो सावधान पुढील घंटा’ ही धोक्याचीच समजावी लागणार आहे.