Thursday, September 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर..

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक आज,गुरुवार १७ सप्टेंबरला जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार,८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७ या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडेल,तर दहावीच्या परीक्षेसाठी १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७ हा कालावधी निश्चित करण्यात आला असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ.दीपक माळी यांनी दिली आहे.राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर,औरंगाबाद, मुंबई,कोल्हापूर,अमरावती,नाशिक,लातूर,कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी आणि बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येते.विद्यार्थ्यांना अभ्यासाचे अतिरिक्त नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षापासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे.परंतु यंदा एक महिना उशिरा म्हणजेच सप्टेंबर महिन्यात दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.मंडळाच्या वेबसाईटवरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा,उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरुपात दिले जाणारे वेळापत्रक अंतिम असेल.इतर वेबसाईटवरील किंवा इतर यंत्रणेने छापलेले तसेच व्हॉट्सॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल होणारे वेळापत्रक ग्राह्य धरु नये,असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.
  • दहावी आणि बारावीचे संभाव्य वेळापत्रक👇
बारावी लेखी परीक्षा– ८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७
बारावी- प्रात्यक्षिक,श्रेणी,तोंडी परीक्षा- २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७
दहावी लेखी परीक्षा- १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७
दहावी- प्रात्यक्षिक,श्रेणी, तोंडी परीक्षा-२८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट; वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात आज,गुरुवार १७ सप्टेंबर रोजी काही भागात अचानकपणे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावून वीज कोसळण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू...

शाळांच्या गुणवत्तावाढीला बळ; पवित्र पोर्टलच्या माध्यमातून देसाईगंज नगरपरिषद शाळांना मिळाले सहा नवे शिक्षक.

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नगरपरिषद देसाईगंज अंतर्गत शाळांमधील शैक्षणिक मनुष्यबळाची कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे सहा नवनियुक्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे नियुक्ती...

धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव; आमदार मसरामांकडून कृषी विभागाला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागांत धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होताच तक्रारींची तात्काळ दखल घेत...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पारंपरिक कारागीर व शिल्पकारांचा टूल किट व कर्ज मंजुरी पत्र वाटप सोहळा’ संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या श्रमाला उत्पादकतेची जोड देणे आवश्यक आहे.पारंपरिक कारागीर,शिल्पकार आणि असंघटित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!