Monday, August 17, 2026
Homeगडचिरोलीतृतीयपंथीयांच्या समस्यांच्या तक्रार निवारण समितीवर सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीयांच्या समस्यांच्या तक्रार निवारण समितीवर सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- राज्यातील तृतीयपंथीयाच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करणेबाबतचा मुद्दा तिस-या महिला धोरणामध्ये समाविष्ठ आहे.तृतीयपंथी,ट्रान्सजेंडर हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असुन; या घटकास समाजाकडुन सापत्न व भेद भावाची वागणुक दिली जाते.नेहमीच भेदभाव,

सापत्न वागणुकी मुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रियेपासुन दुर्लक्षित राहिलेले आहे. त्यामुळे या समाज घटकांचे शासना मार्फत मुलभुत अधिकारांचे संरक्षण करुन त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. तृतीय-२०१८ प्र.क्र.२६/सामासु दि. ०७ ऑक्टोंबर २०२० अन्वये जिल्हयातील तृतीयपंथीय यांच्या तक्रारीचे,समस्यांचे जिल्हास्तरावर तक्रार निवारण होणे आवश्यक आहे. या करीता जिल्हास्तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे.सदर जिल्हास्तरीय समितीवर सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक व्यक्तीची नेमणुक करावयाची आहे. 

यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणा-या इच्छुक संबंधित व्यक्तीनी २७ फेब्रुवारी २०२३ पर्यत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

जिल्हास्तरीय समितीवर सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक व्यक्ती सदस्यांची नव्याने समावेश करुन समितीचे पुनर्गठन करण्यात येणार आहे.त्याकरीता सामाजिक क्षेत्रात काम करणा-या इच्छुक व्यक्तींनी, गडचिरोली जिल्हातील संबंधीत व्यक्तीनी सहाय्यक आयुक्त् समाज कल्याण गडचिरोली डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, एल.आय.सी. ऑफिस रोड आयटीआय चौक,गडचिरोली-४४२६०५ या पत्त्यावर किंवा कार्यालयाचा संपर्क क्र.०७१३२ -२२२१९२ वर संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली यांनी केले आहे .

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!