Monday, July 20, 2026
Homeगडचिरोलीतिकडे दोन वृक्षांच्या तोडीसाठी अधिवेशन गाजले; तर इकडे तब्बल ९ सागवान वृक्षतोडीची...

तिकडे दोन वृक्षांच्या तोडीसाठी अधिवेशन गाजले; तर इकडे तब्बल ९ सागवान वृक्षतोडीची कारवाई थंडबस्त्यात.. – गडचिरोली वनवृत्तातील प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नुकतेच राज्याच्या उपराजधानीत ८ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाचे रविवार,१४ डिसेंबर रोजी सूप वाजले.अधिवेशनात सर्वात जास्त फोकस पडला तो महसूल विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांचे निलंबन.राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तब्बल १४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन केल्याने सर्वांचे धाबे दणाणले. अशातच चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा शहरातील हनुमान मंदिर परिसरात पोळ्याच्या दिवशी नगर परिषद प्रवेशद्वारा समोरील चिचवा व जांभूळ प्रजातीच्या दोन झाडांची विनापरवानगीने कत्तल करण्यात आल्याने राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून वृक्षतोडीचे प्रकरण सभागृहात मांडले.प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.केवळ दोन वृक्षांची तोड झाल्याने अधिवेशन गाजले.मात्र,गडचिरोली वनवृत्ताच्या वडसा वन विभागा अंतर्गत येणाऱ्या पुराडा वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील रामगड उपक्षेत्रातील रामगड नियतक्षेत्र कक्ष क्रमांक-२४१ मध्ये मुख्य मार्गालगत अज्ञात इसमांनी तब्बल ९ सागवान वृक्षांची अवैधरीत्या वृक्षतोड केल्याने याबाबत पुराव्यानिशी तक्रार करूनही गेल्या दीड महिन्यांपासून अजूनपावेतो कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसल्याने ‘आम्ही करू ती पूर्व दिशा’ असे तर केले जात नाही ना.!
विशेष म्हणजे,सागवान तस्करांनी अवैधरीत्या वृक्षतोड करून पळवाटेसाठी मुख्य मार्गालगत मुरूम टाकून रस्ता केला.त्यातच,वृक्ष तोडीसाठी मशिनचा वापर करण्यात आला.याबाबत उपवनसंरक्षक वडसा तसेच गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक यांना अवैध सागवान वृक्ष तोडीबाबत कारवाई करण्यास पत्रव्यवहार करून वेळोवेळी कळविण्यात आले आहे.मात्र,गेल्या दीड महिन्यांपासून अजूनपावेतो कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.पुराडा वनपरिक्षेत्रात झालेल्या अवैध सागवान वृक्षतोडीबाबत अधिकाऱ्यांना गांभीर्य नसून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रकार दिसून येत आहे.सागवान सारखे मौल्यवान वृक्ष मशीनच्या साहाय्याने वन क्षेत्रातून अवैधरीत्या तोडण्यात आले असतांनाही कारवाई करण्यास चालढकल करण्यात येत असल्याने याचे नवल वाटत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशातील सध्याचे चित्र काही खरे नाही. अनेकजण आपली जबाबदारी व चूक मान्य करण्यास तयारच नाहीत.तुम्ही काहीही करा,आम्हाला कसलाही फरक पडणार नाही....

कारला ट्रकची ठोसर; भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर विरूळ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तब्बल सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.यात कारमधील एका कुटुंबातील चार सदस्य,ट्रकचा...

९० किलो प्रतिबंधित तंबाखूसह ७ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका चारचाकी वाहनाने मध्य प्रदेशच्या पांढुर्णा येथून सावनेर मार्गे नागपूरच्या दिशेने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या सावनेर तालुक्याच्या केळवद पोलिसांनी...

शाखा अभियंत्याच्या निलंबनानंतर आता ग्रामसेवक निलंबित.. – गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा कारवाईचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मनमानीचा कारभार करू पाहणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांवर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केल्याने जिल्हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!