Tuesday, July 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तजोरदार पावसाचा नवा अंदाज; पुढील पाच दिवस पावसाचे..

जोरदार पावसाचा नवा अंदाज; पुढील पाच दिवस पावसाचे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा सुधारित अंदाज वर्तविला होता.त्यानुसार,१५ जुलैपासून महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली.विशेषतः १६ जुलैपासून विदर्भात पावसाने हजेरी लावून पावसाअभावी संकटात सापडलेल्या खरिपाच्या पिकांना जीवदान दिल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले.जर कां पाऊस आणखी काही दिवस लांबणीवर गेले असते तर शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट ओढवले असते. अश्यातच आता हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी जोरदार पावसाचा नवा अंदाज वर्तवला आहे.हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार,आज रविवार १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकाडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील बीड,परभणी,हिंगोली,जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.तसेच विदर्भातील अकोला,अमरावती,बुलढाणा,भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली,नागपूर,वर्धा,वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट देण्यात आला आहे.मुंबईसह कोकणात रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच पालघर,ठाणे आणि नवी मुंबई या भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशातील सध्याचे चित्र काही खरे नाही. अनेकजण आपली जबाबदारी व चूक मान्य करण्यास तयारच नाहीत.तुम्ही काहीही करा,आम्हाला कसलाही फरक पडणार नाही....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!