Wednesday, August 5, 2026
Homeगडचिरोलीजिल्हा नियोजन विकास निधीचा योग्य वापर करून विकास कामे मार्गी लावा... -...

जिल्हा नियोजन विकास निधीचा योग्य वापर करून विकास कामे मार्गी लावा… – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे निर्देश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात विकासकामांसाठी प्रचंड वाव असून,विविध विभागांनी आपसी समन्वय साधून जिल्हा नियोजन विकास निधीचा योग्य वापर करून कामे मार्गी लावावीत,असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले.त्यांनी जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत प्रकल्पांसाठी योग्य नियोजन आणि निधीचा प्रभावी उपयोग करण्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विविध विभागांना जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर झालेल्या निधीच्या खर्चाचा आढावा मॅराथॉन बैठकीतून घेतला.त्यांनी विभाग प्रमुखांना दायित्व रक्कमेची अगोदर मागणी करून नंतर नवीन कामांची नोंदणी ईपास प्रणालीवर प्राधाण्याने करण्याचे आणि प्राप्त निधी तातडीने खर्च करण्याच्या सूचना दिल्या.तसेच नियोजन विभागानेही प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांचा निधी प्राप्त निधीच्या प्रमाणात संबंधीत विभागांना तातडीने बीडीएस प्रणालीवर वितरीत करण्याचे सांगितले.
येत्या काळात जिल्ह्यातील खाणकाम रोजगार मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने कौशल्य विकास विभागाने खाणकामाशी संबंधित प्रशिक्षण सुरू करावे,सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील पर्यटन स्थळे आणि गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष नियोजन करावे,जिल्हा ग्रंथालयाने सुसज्ज आणि आधुनिक ग्रंथालय निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत,असेही त्यांनी सुचवले. विकासनिधी मंजूर असलेल्या सर्व कार्यालयांनी निधी खर्चासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरी तातडीने मिळवावी,असे स्पष्ट निर्देश यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले.यासंदर्भात निधी उपलब्धता,प्रशासकीय मान्यता अथवा इतर कोणत्याही अडचणी असल्यास संबंधीत विभागाने आपल्याशी प्रत्यक्ष संपर्क करण्याच्या सूचनाही त्यांनी यसाप्रसंगी दिल्या.बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

गडचिरोली जिल्ह्याला ४८ आधार नोंदणी संच प्राप्त; इच्छुक सेवा केंद्र चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात आधार नोंदणी व बायोमेट्रिक अद्ययावतीकरणाच्या सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र...

आता “पोलीस पाटी” अथवा “पोलीस” नाव लिहिलेल्या खासगी वाहनांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील बरेचसे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या खासगी दुचाकी वा चारचाकी वाहनांवर 'पोलीस' असे लाल अक्षरात लिहिणे किंवा तशी पाटी लावून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!