उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ९ फेब्रुवारी वाढदिवसाचे औचित्य साधुन जिल्हयामध्ये “जागरुक पालक, सुदृढ बालक” या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे.”जागरुक पालक,सुदृढ बालक” या मोहिमेमध्ये जिल्हयातील ० ते १८ वर्ष वयोगटातील एकुण २,९२,०५१ मुला-मुलींची संपुर्ण आरोग्य तपासणी जिल्ह्यातील अंगणवाडी केन्द्र व शाळांमध्ये करण्यात येत आहे व आजारी बालकांना औषधोपचार त्याचप्रमाणे आवश्यक्तेनूसार वरिष्ठ आरोग्य संस्थेमध्ये पुढिल उपचार,तपासणी तसेच शस्त्रक्रियेसाठी संदर्भीत केले जात आहे.
सद्यास्थितीमध्ये जिल्हयातील ० ते ६ वर्ष वयोगटातील ९९१६८ मुला-मुलींपैकी ४९०६२ मुला-मुलींची तपासणी करण्यात आलेली असून त्यापैकी आजारी आढळुन आलेल्या मुला-मुलींना औषधोपचार करुन पुढिल तपासणीसाठी तसेच शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ आरोग्य संस्थेमध्ये संदर्भीत करण्यात आले.६ ते १८ वर्ष वयोगटातील १९२८३३ मुला-मुलींपैकी ८९७०६ मुला- मुलींची तपासणी करण्यात आलेली असून त्यापैकी आजारी आढळुन आलेल्या मुला-मुलींना औषधोपचार करुन पुढिल तपासणीसाठी तसेच शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ आरोग्य संस्थेमध्ये संदर्भीत करण्यात आले.”जागरुक पालक, सुदृढ बालक” ही मोहिम गडचिरोली जिल्हयामध्ये जिल्हाधिकारी गडचिरोली,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून सदर मोहिमेमध्ये सर्व पालकांनी आपल्या मुला-मुलींची संपूर्ण आरोग्य तपासणी करुन घेण्याचे आवाहन डॉ.दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद,गडचिरोली, डॉ.अनिल रुडे,जिल्हा शल्य चिकित्सक,सामान्य रुग्णालय,गडचिरोली तसेच डॉ.स्वप्निल बेले,जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी केले आहे.