- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत तसेच ते जप्त करण्याबाबत कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत, असा खुलासा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तसेच लघु पाटबंधारे विभागाच्या जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी केला आहे.यासंदर्भात सोशल मीडिया व व्हॉट्सॲपवर प्रसारित होत असलेल्या अप्रमाणित संदेशांवर शेतकरी व नागरिकांनी विश्वास ठेवू नये,असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाअभावी पाणीटंचाई निर्माण झाल्यास रब्बी अथवा उन्हाळी पिकांसाठी धरणातील पाणी सोडण्यात येणार नसल्याचा मजकूर संबंधित संदेशात आहे.तसेच नदी, नाले,तलाव,बोडी व इतर जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन २५ ऑक्टोंबरपर्यंत काढून घ्यावेत; अन्यथा ते जप्त करण्यात येतील,असेही या खोट्या संदेशात नमूद करण्यात आले आहे.
मात्र,अशा स्वरूपाच्या कोणत्याही सूचना,आदेश अथवा निर्देश या दोन्ही विभागांमार्फत जारी करण्यात आलेले नाहीत.प्रसारित होत असलेल्या संबंधित संदेशाचा या विभागांशी कोणताही संबंध नसल्याचे खुलाशात स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांनी व शेतकऱ्यांनी अशा अप्रमाणित संदेशांमुळे निर्माण होणाऱ्या गैरसमजांना बळी पडू नये.कोणत्याही शासकीय सूचना किंवा आदेशांची सत्यता पडताळण्यासाठी संबंधित शासकीय कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन संबंधित विभागांनी केले आहे.
- Advertisement -

