Saturday, March 15, 2025
Homeगडचिरोली "जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा"..- १९ फेब्रुारी पासून राज्याचे राज्यगीत अंगी...
spot_img

 “जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा”..- १९ फेब्रुारी पासून राज्याचे राज्यगीत अंगी करण्यात येणार…..- सावधान उभे राहण्या पासून कुणाला सुट देण्यात आली ते पहा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्यातील तरुणाई तसेच समाजातील सर्वच नागरिकांना स्फुर्तीदायक असणारे “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरणांचे गीत “महाराष्ट्राचे राज्यगीत” म्हणून स्विकारण्यात आले आहे.या राज्यगीताचे शब्द व गायलेल्या तसेच वाद्यधून स्वरुपातील गीताची ऑडिओ क्लिप शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.तसेच या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयाची प्रतही शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदर गीत दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ पासून  महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून अंगिकारण्यात येत आहे. राज्यगीत सुमारे १.४१ मिनीटात वाजविता व गाता येईल.

राज्यगीत अंगीकारण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरीही राष्ट्रगीताचा मान,सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील.शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्यगीताचे गायन वादन हे ध्वनीमुद्रीत आवृतीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे.१ मे महाराष्ट दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले व गायले जाईल.  राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी, परिपाठ,प्रतिज्ञा,प्रार्थना व राष्ट्रगीत यासोबत राज्यगीत वाजविले गायले जाईल.राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था,सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था,स्वयंसेवी संस्था,खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरीकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम इत्यादी मध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास गाण्यास मुभा राहील.

राज्यगीत सुरु असतांना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्यगीताचा सन्मान करावा.

सावधान राहण्या पासून सुट

लहान बालके,गरोदर स्त्रिाया,आजारी व्यक्ती,दिव्यांग व्यक्ती तसेच वृध्द व्यक्ती यांना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल.राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते  तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुध्दा बाळगण्यात यावे. हे गीत वाजवितांना गातांना त्याचा योग्य सन्मान राखण्यात यावा.वाद्यसंगीतावर आधारीत या गीताचा वाद्यधून पोलीस बँडमार्फत वाजविता येईल.या अधिकृत राज्यगीताची लिंक राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध राहील.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!