Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीचॉकलेटचे आमिष दाखवत माजी तलाठ्याने दोन अल्पवयीन चिमुकलींवर केला अत्याचार.. - पोलिसांनी...

चॉकलेटचे आमिष दाखवत माजी तलाठ्याने दोन अल्पवयीन चिमुकलींवर केला अत्याचार.. – पोलिसांनी ठोकल्या बेड्या; गडचिरोली जिल्ह्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ५६ वर्षीय तलाठ्याने दोन अल्पवयीन चिमुकलींवर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना काल,२७ ऑक्टोंबरला धानोरा पोलिस ठाणे हद्दीत उघडकीस आली. पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून त्यास बेड्या ठोकल्या.शंभू मुरारी आतला वय ५६ वर्षे असे आरोपीचे नाव आहे. त्याने प्रकृतीच्या कारणास्तव दोन वर्षापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.तो दुमजली घर बांधून पत्नीसमवेत राहत होता.त्याची पत्नी व मुले बाहेरगावी गेले होते; त्यामुळे तो २६ ऑक्टोंबर रोजी एकटाच घरी होता.घराजवळ अंदाजे सहा व नऊ वर्षीय मुली खेळत होत्या.त्याने चॉकलेटचे आमिष दाखवून त्यांना घरात नेले व त्यांच्याशी कुकर्म केले.

दोन मुलींपैकी एका मुलीचा भाऊ बहिणीच्या शोधात बाहेर आला.शंभू आतला याच्या घरातून बहिणीचा ओरडण्याचा आवाज आल्याने त्याने तिकडे धाव घेतली व हा सगळा घृणास्पद प्रकार पाहिला.त्यानंतर त्याने आरडाओरड केली.रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी शंभू आतला यास बेड्या ठोकल्या.दरम्यान,आरोपी शंभू आतला यास काल,२७ ऑक्टोंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!