Saturday, June 27, 2026
Homeगडचिरोलीचुडाराम बल्हारपुरे लिखित "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" नाटकास पुन्हा एक...

चुडाराम बल्हारपुरे लिखित “गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” नाटकास पुन्हा एक पुरस्कार जाहीर…-कोल्हापूरच्या दिमाखदार सोहळ्यात केले जाणार पुरस्कार प्रदान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-तितिक्षा इंटरनॅशनल,पुणे संस्थेतर्फे  सन २०१५ पासून तितिक्षा साहित्य कला संमेलन व  ‘उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा’ आयोजित करण्यात येतात.व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना साहित्य संमेलनात साहित्य प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या इंटरनॅशनल पुरस्काराकरीता नाट्यवांड्.मय प्रकारात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या “गोंडवानाचा महायोध्दा; क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” या नाटकास नाट्यलेखनाचे पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे “तितिक्षा इंटरनॅशनल ट्रस्टच्या संस्थापिका व अध्यक्षा तसेच पुरस्कार समिती प्रमुख प्रिया प्रमोद दामले व अजीता मुळीक यांनी कळविले असून रविवार, दि.९ जून ला हॉटेल अयोध्या,कावळा नाका,कलानगरी,कोल्हापूर येथे होणाऱ्या तितिक्षा साहित्य कलासंमेलन २०२४ च्या दिमाखदार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम,सन्मानचिन्ह, सन्मान वस्त्र,सन्मानपत्र व अक्षरधन असे आहे.विशेष म्हणजे या नाटकास यापूर्वी कंथेवाडी,ता.राधानगरी जि.कोल्हापूर येथील ‘गगनगिरी महाराज साहित्य गौरव पुरस्कार- २०२३ ‘, मौजा-फलटण (जिल्हा- सातारा येथील धर्मविर संभाजी महाराज उत्कृष्ट साहित्य पुरस्कार- २०२४ प्राप्त झाले आहे.या नाटकाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयोग सुरू असून नुकत्याच भोपाळ (मध्यप्रदेश) येथे झालेल्या जनयोद्धा राष्ट्रीय समारोहात या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला आहे.

चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील राज्य पुरस्कार प्राप्त नाटककार आहेत.त्यांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार प्राप्त झालेले आहे. आजपर्यंत त्यांची विविध १३ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध स्तरावरील अनेक पुरस्काराने ते सन्मानीत आहेत.महामृत्युंजय मार्कंडेश्वर,महापूजा, बहूढंगी समाधीवाले बाबा,स्पेशल रिपोर्ट,धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा व गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.

चुडाराम बल्हारपुरे,गडचिरोली यांच्या या यशाबद्दल प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे,यादव गव्हाणे, प्रा.डॉ.श्याम मोहरकर, प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम,प्रा.डॉ.योगीराज नगराळे,दै. लोकमतचे संजय तिपाले,दै.हितवादचे रोहिदास राऊत,दै.देशोन्नतीचे नरेश बावणे,दै.सकाळचे मिलिंद उमरे,दै.पुण्यनगरीचे प्रल्हाद म्हशाखेत्री व प्रमोद गेडेकर,प्रा.नवनीत देशमुख (साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक) व इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

गडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित,दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या...

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!