Tuesday, April 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तचुकीचे पर्याय निवडलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई- केवायसी करण्याची शेवटची संधी; उरले फक्त...

चुकीचे पर्याय निवडलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई- केवायसी करण्याची शेवटची संधी; उरले फक्त काही दिवस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण
योजनेसाठी ई-केवायसी करतांना अनेक लाडक्या बहिणींनी चुकीचे पर्याय निवडले होते,त्यामुळे त्यांना मिळणारा लाभ हा बंद झाला होता.ज्या महिलांनी ई-केवायसी करतांना चुका केल्या होत्या,अशांसाठी शासनाकडून ३१ मार्च २०२६ ही अंतिम तारीख देण्यात आली होती.मात्र,राज्यातील जास्तीत-जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळावा आणि तांत्रिक कारणांमुळे कोणीही वंचित राहू नये,यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवार १ एप्रिल २०२६ रोजी योजनेतील ई-केवायसी दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा केली आहे.त्यानुसार,सदरची मुदतवाढ ही चालू महिन्याच्या ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याने महिलांना ई-केवायसी दुरुस्तीसाठी केवळ सात दिवस उरले आहेत.यानंतर कुठल्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुदतवाढ देत असतांनाच स्पष्ट केले होते. त्यामुळे,ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी दुरुस्ती केलेली नसेल,अश्यांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी; अन्यथा महिण्याकाठी मिळणारे दीड हजार रुपये कायमचे बंद होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

घर बांधणे झाले महाग; लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाडले..

उद्रेक न्युज वृत्त :-बांधकाम साहित्यांच्या वाढत्या किमतींमुळे लोकांच्या बजेटवर मोठा ताण आल्याचे चित्र आहे.यामुळे सर्वसामान्यांना घर बांधणे कठीण झाले आहे.लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाळल्याने...

खेळता-खेळता सांडपाण्याच्या खड्यात पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खेळत असतांनाच घरालगत असलेल्या सांडपाण्याच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील शिक्षक...

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

आता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अजूनही विशेषतः ग्रामीण आणि काही दुर्गम भागात छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जातात.अनेकदा मुलगी अल्पवयीन असतांनाही तिचे लग्न लावून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!