उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- चामोर्शी तालुक्यातील नवरगांव येथे रिपब्लिकन पक्षाची बैठक रिपाईचे जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मार्गदर्शक म्हणुन शेट्युल्ड कॉस्ट फडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.विनय बाबोळे,शरद लोणारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.बैठकी दरम्यान ॲड.विनय बांबोळे म्हणाले की,बौद्ध बांधवावर अनेक संकटे येतात.परंतु त्याला न घाबरता आपण कायद्याच्या लढाईतुन समस्या सोडविल्या पाहीजे.आपले हक्क आणि अधिकार मिळविले पाहीजे.त्याच्रमाणे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्चर बोरकर यांनी रिपब्लिकन पक्ष हा २०% राजकारण व ८०% समाजकारण करून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर आहे. निवडणूक येतात आणि जातात परंतु जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी रिपाई पलीकडे इतर कोणताही पक्ष आपली सामाजीक समस्या सोडवायला येत नाही.आम्ही सर्वतोपरी आपणांस सहकार्य करू असे त्यावेळी बोरकर यांनी म्हटले आहे.बैठकी प्रसंगी अनेक महत्वाच्या व इतर समस्यांवर चर्चा करून त्यावर अंमबजावणी करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
सदर बैठकीस कविश्वर झाडे,डायमंड वाकडे,प्रमोद गोवर्धन,जागेश्वर कोंडागुले,सुरेश वनकर,लक्ष्मण वणीकर,प्रमोद गोवर्धन,प्रकाश झाडे,करिष्मा वणीकर, ऋतुजा दुर्गे,मच्छगंधा वनीकर,हेमलता वाकडे सहीत नवरगांव येथील रिपाईचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.