उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यात उद्या १६ फेब्रुवारी रोजी विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी गडचिरोली येथे येणार असून शिवछत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवचरित्रावरील राजमुद्रा युवाप्रतिष्ठान च्यावतीने मिटकरी यांचे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला नागरिकांनी बहूसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजमुद्रा युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.उद्या सायंकाळी ५ वाजता औद्योगीक वसाहत रोड टि-पॉईंट चौक,कॉम्पलेक्स एरिया याठिकाणी मिटकरी यांचे शिवचरित्रावर जाहीर व्याख्यान होणार आहे.

