उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- पिपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा प्रेस क्लब गडचिरोली येथे १२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १२ वाजता आयोजीत करण्यात येणार आहे.पिरिपाच्या गडचिरोली जिल्हा मेळाव्याचे अध्यक्ष पिरिपाचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर तसेच पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष लाँग मार्च प्रणेते माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्या नंतर प्रा.जोगेंद्र कवाडे चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाड(खुर्द)येथील तथागत भगवान गौतम बुद्ध मुर्तीच्या अनावरण सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत.तरी सदर मेळाव्यास पिरिपाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पिरिपाचे उपाध्यक्ष मारोती भैसारे,सरचिटणीस मुर्लीधर भानारकर, ॲड.सि.एम.जनबंधू ,सोनु साखरे, सिद्धार्थ नंदेश्वर,प्रमोद सरदारे,रोशन उके,जिवन मेश्राम आदींनी केले आहे.