उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने पोलिस शिपाई चालक व पोलिस शिपाई पदाची भरती प्रक्रिया सुरू आहे; मात्र या पोलिस भरतीत पावसाने एन्ट्री केल्याने शनिवारी २२ जून रोजी होणारी पोलिस शिपाई पदासाठीची मैदानी चाचणी रद्द करून पुढे ढकलण्यात आली आहे.२२ जूनची रद्द झालेली चाचणी आता १३ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.
२१ जून रोजी रात्री नऊ वाजेनंतर शहरात सरी बरसल्याने २२ जून रोजीची नियोजित मैदानी चाचणी रद्द करण्याचा निर्णय रात्री उशिरा घेण्यात आला. जिल्हा पोलिस दलामार्फत पोलिस शिपाई चालक पदाच्या १० जागांसाठी तसेच पोलिस शिपाई पदाच्या ९१२ जागांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
पोलिस मुख्यालयावर पोलिस शिपाई चालक पदासाठी २२५८ उमेदवारांची मैदानी (शारीरिक) चाचणी पार पडली.२१ जूनपासून पोलिस शिपाईपदाच्या चाचणीला सुरुवात झाली.दरम्यान, २१ जूनला रात्री नऊ वाजता पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे २२ जून रोजीची मैदानी चाचणी रद्द करण्याचा निर्णय पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी घेतला.
२२ जून रोजीची चाचणी १३ जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

