Thursday, June 25, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली 'नाट्यश्री' कविता स्पर्धेतील बाविसाव्या सत्रात सौ.माधुरी अमृतकार विजयी…

गडचिरोली ‘नाट्यश्री’ कविता स्पर्धेतील बाविसाव्या सत्रात सौ.माधुरी अमृतकार विजयी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोली च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता ” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते.व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 

या उपक्रमाचे बाविसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २६ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात नाशिक जिल्ह्यातील कवयित्री सौ.माधुरी अमृतकार यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “मुर्ती वात्सल्याची” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे  व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

सौ.माधुरी नामदेव अमृतकार या मौजा-सटाणा (ता.त्र्यंबकेश्वर, जिल्हा- नाशिक) येथील रहिवासी असून प्रसिद्ध कवयित्री आहेत.पाचशे च्या जवळपास कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे.अनेक वृत्तपत्रांतून त्याच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत.व्हॉट्सॲप गृपवरुन सुरू असलेले त्यांचे ‘स्वरचित मधुर वाणी’ हे सदर विशेष लोकप्रिय असून जवळपास १२००चा टप्पा या सदराने पार केलेला आहे.त्यांना अनेक ऑनलाईन पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. 

त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.या बाविसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने नरेंद्र गुंडेली, वंदना सोरते,माधुरी अमृतकर,गजानन गेडाम,कृष्णा कुंभारे,जयराम धोंगडे,रोशन येमुलवार,भिमानंद मेश्राम,अंगुलीमाल उराडे,सुरज गोरंतवार,गणेश रामदास निकम,मिलींद बी.खोब्रागडे,अजय राऊत, तुळशीराम उंदीरवाडे,पुनाजी कोटरंगे,प्रभाकर दुर्गे, मधुकर दुफारे,पुरुषोत्तम दहिकर,विलास जेंगठे,  संतोष कपाले,डॉ.मंदा पडवेकर,मुरलीधर खोटेले, अनुराग मुळे,रेखा दिक्षित,सुनील मंगर,सुजाता अवचट इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.

या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

    – चुडाराम बल्हारपुरे(नाटककार)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!