Monday, October 12, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच ब्रास मोफत वाळू साखरा व आंबेशिवणी डेपोतून..

गडचिरोली तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच ब्रास मोफत वाळू साखरा व आंबेशिवणी डेपोतून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात एप्रिल २०२५ पासून आतापर्यंत वाळू/रेतीची ३८ प्रकरणे व मुरुम,मातीची ३ प्रकरणे अशा एकूण ४१ प्रकरणांमध्ये दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत तहसील कार्यालयाकडून तब्बल ४० लाख ९८ हजार ६५२ रुपये एवढा दंड ठोठावण्यात आलेला आहे.तहसीलदार सागर कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार,जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध उत्खनन रोखण्यासाठी प्रशासनाने कारवाई अधिक तीव्र केली असून,गेल्या १० दिवसांत अवैध रेती/वाळूचे उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ४ ट्रॅक्टर आणि २ टिप्परवर कारवाई करून ती वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत. या वाहनांकडून ७ लाख ४८ हजार ८०० रुपये एवढी दंड वसुलीची कार्यवाही सध्या सुरू आहे.याव्यतिरिक्त,ज्या रेती घाटांवरून अवैधपणे उत्खनन व वाहतूक होते,त्या घाटांकडे जाणारे रस्ते खोदून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.त्याचबरोबर,सदर अवैध रेती उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याकरिता तालुका स्तरावर पथके स्थापन करण्यात आली असून,त्यांच्या मार्फतीने दररोज गस्त घालण्यात येत आहे.
अनाधिकृत उत्खनन करून अवैधपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आता महाराष्ट्र शासन परिपत्रक  २६ नोव्हेंबर, २०२५ अन्वये अधिक कठोर कारवाई केली जात आहे. यानुसार,पहिला गुन्हा आढळल्यास ३० दिवस परवाना निलंबित करून वाहन अटकावून ठेवणे आणि दुसरा गुन्हा आढळल्यास ६० दिवस परवाना निलंबित करून वाहन अटकावून ठेवणे,अशी कार्यवाही केली जाईल. तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास, वाहन अटकाव करून परवाना रद्द करण्यासाठी संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत कार्यवाही करीता पाठविण्यात येणार आहे.दुसरीकडे,सर्वसामान्य नागरिकांना आणि घरकुल लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने वाळू उपलब्ध करून देण्याची योजना जाहीर केली आहे. गडचिरोली तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मौजा साखरा व आंबेशिवणी येथील वाळू डेपोमधून तसेच निश्चित केलेल्या इतर वाळू घाटामधून ५ ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तसेच, स्थानिक वापराकरीता नागरिकांना सुरु असलेल्या बांधकामाकरीता लिलावात न गेलेल्या संबंधित नगर परिषद/ग्रामपंचायत हद्दीतील घाटांमधून ६०० रुपये स्वामित्वधन व इतर कर आकारुन वाळू उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.यासाठी स्थानिक नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयामध्ये अर्ज सादर करावा,असे गडचिरोली तहसीलदार कांबळे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सीईओचा कारवाईचा सपाटा; आता चातगावचा ग्रामसेवक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच काही दिवसांपूर्वी शासकिय निधीचे नुकसान करणे व इतर अनियमितता करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक...

पायाला चिखल माखल्याने धुण्यासाठी मोठ्या नहराजवळ गेले अन् विपरीत घडले; पती-पत्नीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेत पाहण्यासाठी शेतीवर गेले असता पायाला चिखल माखल्याने पाय धुण्यासाठी गोसेखुर्दच्या उजव्या कालव्याजवळ(मोठा नहर)गेले असता पत्नीचा पाय घसरला आणि ती पाण्यात...

अखेर ‘त्या’ तरुणाची ओळख पटली; रेल्वेने कटून शरीराचे झाले होते दोन तुकडे..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एका अज्ञात तरुणाचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी सकाळच्या सुमारास देसाईगंज शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या देसाईगंज-गोंदिया मार्गावरील तुकुम परिसरातील...

आणखी एका शेतकऱ्याने तलावात उडी घेत संपवले जीवन..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथील ५३ वर्षीय शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी विहिरीत उडी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!