Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्याला राज्य बाल संरक्षण आयोग सदस्यांची भेट

गडचिरोली जिल्ह्याला राज्य बाल संरक्षण आयोग सदस्यांची भेट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यात बालकांबाबत काम करणाऱ्या विविध यंत्रणा यांना अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग,मुंबई यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ऍड.संजय शेंगर व चैतन्य पुरंदरे यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट देऊन बाल सरंक्षण क्षेत्रातील शासकीय मुलांचे निरीक्षनगृह व बालगृह, सखी वन स्टॉप सेंटर,बाल कल्याण समिती,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईन १०९८ गडचिरोली या सर्व यंत्रणांना भेट दिली.

महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण हक्क आयोग सदस्य ऍड.संजय शेंगर व चैतन्य पुरंदरे यांनी सर्वप्रथम गडचिरोली जिल्हयातील बाल कल्याण समिती येथे भेट दिली व समिती सदस्यांसोबत कामकाजाविषयी काही प्रकरणावर चर्चा करून निर्देश दिले व कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी वर्षा मनवर अध्यक्ष बाल कल्याण समिती गडचिरोली,ऍड. राहुल नरुले,डॉ.संदीप लांजेवार,दिनेश बोरकुटे, काशिनाथ देवगडे सदस्य बाल कल्याण समिती गडचिरोली उपस्थित होते. 

नंतर बालगृहाची पाहणी केली व काही सूचना केल्या व प्रवेशितांसोबत संवाद साधला.सखी वन स्टॉप सेंटर येथे भेट देऊन त्याठिकाणी व्यवस्थेची पाहणी केली व कामकाजा बाबत समाधान व्यक्त केले.गडचिरोली जिल्ह्यात एवढे सुंदर काम होऊ शकते; हे सर्व राज्य भर राबविण्यात येईल असे वक्तव सदस्य यांनी केले 

त्यानंतर महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली येथील जिल्हा बाल संरक्षण कक्षात बाल कल्याण समिती,बाल न्याय मंडळ,चाईल्ड लाईन १०९८,सखी वन स्टॉप सेंटर,बाल पोलीस पथकातील अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण कक्ष,कर्मचारी बाल विकास प्रकल्प अधिकारी (शहरी) कर्मचारी वर्ग यांची बैठक घेण्यात आली.त्यात सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत ऍड.संजय शेंगर, चैतन्य पुरंदरे यांनी बाल हक्क आयोगाचे काम व बाल स्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत  मार्गदर्शन केले.जिल्ह्यातील पोलीस स्टेशन जिल्हा बाल संरक्षण कक्ष रुग्णालय इत्यादी ठिकाणे बालस्नेही करण्याबाबत अपेक्षा व्यक्त केल्या.एका बालविवाह प्रकरणात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. 

सदर बैठकीचे नियोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले,बाल संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुर,प्रियंका आसुटकर,सामाजीक कार्यकर्ता तनोज ढवगाये,माहिती  विश्लेषक उज्वला नाकाडे, क्षेत्रकार्यकर्ता निलेश देशमुख,रवींद्र बंडावार यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन कवेश्वर लेनगुरे बाल संरक्षण अधिकारी यांनी केले तर जयंत जथाडे सामाजिक कार्यकर्ता यांनी सदर बैठकीत उपस्थितांचे आभार मानले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!