उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- जिल्ह्यात काही वेळातच वीजा व वादळी वार्यासह अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा india meteorological department(IMD) म्हणजेच भारतीय हवामान विज्ञान विभागाने दिला आहे.त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे; असे आवाहन करण्यात आले आहे.
नुकतेच ५ वाजून ५८ मिनिटांनी मोबाईलद्वारे सर्वांना माहिती दिली गेली असली तरीही; काही नागरिकांना याची जाणीव नसते.सर्वप्रथम विजांचे कडकडाट सुरू असल्यास मोबाईल फोन,इंटरनेट व ऑनलाईन सुविधा टाळावे.रस्त्यामध्ये वा इतर शेत शिवारात असल्यास झाडाचा आळोसा घेऊ नये; पूर परिस्थिती वा आपत्ती जनक स्थितीत सापडल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असेही IMD नागपुर यांनी कळविले आहे.