उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया (दरेकसा) : – जिल्ह्यातील गडचिरोली सीमावर्ती भागातील पोलिस ठाणे चिचगड अंतर्गत असलेल्या अतिसंवेदशील नक्षल प्रभावित भागातील पिपरखारी येथे पोलिस विभागाचे मदत केंद्र ( सशस्त्र दूरक्षेत्र) चे ग्रामवासीयांकडून भूमिपूजन व उद्घाटन गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक प्रमुख पाहुणे संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
महाराष्ट्र शासनास वेळोवेळी वरिष्ठांचे दिशानिर्देश व आदेशान्वये पोलिस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथून पाठपुरावा करण्यात आला होता.पिपरखारी येथे 30 जानेवारी रोजी पोलिस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र संदीप पाटील, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनात पिपरखारी गावातील वरिष्ठ, प्रतिष्ठित नागरिक व ग्रामवासी पिपरखारी यांच्या हस्ते पोलिस मदत केंद्र (सशस्त्र दूरक्षेत्राचे) भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला गडचिरोली परिक्षेत्राचे पिपरखारी येथे एओपीच्या बांधकामाचे भुमिपूजन करताना पोलीस अधिकारी, पोलिस उपमहानिरीक्षक प्रमुख पाहुणे संदीप पाटील यांनी उपस्थितांना पोलिस मदत केंद्राचे निर्मिती व सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच जनसामान्य नागरिकांच्या दृष्टीने महत्त्व विषद केले. नवनिर्मित पिपरखारी पोलिस मदत केंद्राचे (सशस्त्र दूरक्षेत्राचे) उद्घाटन व भूमिपूजनाप्रसंगी गोंदिया जिल्हा पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी, सी-६० पथकाचे पोलिस अधिकारी, अंमलदार, राज्य राखीव पोलिस दलातील अधिकारी, अंमलदार,पोलिस ठाणे चिचगडचे ठाणेदार, नक्षल सेलचे अधिकारी, कर्मचारी तसेच मंत्रालयीन वरिष्ठ लिपिक विनोद बोपचे, चिचगड, पिपरखारी परिसरातील प्रतिष्ठित वरिष्ठ नागरिक उपस्थित होते.