- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हरित लवाद प्रशासनाने सन २००० मध्ये वाघूर माशांच्या पालनासह वापरावर बंदी घातली आहे.वाघूर माशांना थाई मांगूर असेही म्हटले जाते.हे मासे अजैविक कचरा खात असल्याने त्यांच्या शरीरात झिंक,कॅडमियम,अर्सेनिक यासह अन्य अत्यंत घातक घटक व जड धातू असतात.त्यामुळे हे मासे पर्यावरणासोबत मानवी आरोग्याला हानीकारक असल्याने त्यांच्या उत्पादन,वापर,साठवणूक व वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.अश्यातच नागपूर जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यातील चिचोली शिवारात एका खासगी मत्स्यपालन केंद्रात वाघूर माशांचे पालन व उत्पादन केले जात असल्याची माहिती नागपूर येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त शुभम कोमरेवार यांना मिळाली असता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पारशिवनी पोलिसांच्या मदतीने धाड टाकून तब्बल ३६ टन प्रतिबंधित वाघूर मासे जप्त करून नष्ट केले.सदरची कारवाई काल गुरुवारी करण्यात आली असून प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.सदरची कारवाई सहाय्यक मत्स्य आयुक्त शुभम कोमरेवार यांच्यासह पारशिवनीचे ठाणेदार किशोर शेरकी,सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अंकित वैद्य,प्रशांत वैद्य व निखिल नरड, कनिष्ठ लिपिक सतीश क्षीरसागर,सहाय्यक फौजदार देवानंद उकेबोंद्रे,पोलिस हवालदार सुरेश धुर्वे यांच्याह कर्मचारी उपस्थित होते.
- Advertisement -

