Thursday, July 16, 2026
Homeगडचिरोलीकुष्ठांतेयांनी कॉलनीमध्ये जीवन जगण्यापेक्षा समाजात राहून सन्मानाचे व प्रतिष्ठेचे जीवन जगावे…. - डॉ.सचिन...

कुष्ठांतेयांनी कॉलनीमध्ये जीवन जगण्यापेक्षा समाजात राहून सन्मानाचे व प्रतिष्ठेचे जीवन जगावे…. – डॉ.सचिन हेमके यांचे प्रतिपादन…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- सार्वजनिक आरोग्य विभाग ,सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) गडचिरोली,सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था अलर्ट इंडिया मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “करू कुष्ठ कलंकाचे निर्मूलन, देऊ प्रतिष्ठेला आलिंगण” याप्रमाणे कुष्ठांतेयाना सन्मान व प्रतिष्ठा मिळावी यासाठी गडचिरोली शहरात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान पंधरवाडा व कुष्ठरोग निवारण दिनाचे औचित्य साधून  कुष्ठरोग जनजागृती लोकशिक्षण रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते. या प्रसंगी  कुष्ठांतेयांनी कालनी युक्त जीवन जगण्यापेक्षा समाजात राहून सन्मानाचे व प्रतिष्ठेचे जीवन जगावे.त्यांना कुठेही बाहेर राहून वेगळे जीवन जगण्याची  तसेच वेगळे राहून वेगळे शिक्षण घेण्याची काहीही गरज नाही असे प्रतिपादन डॉ.सचिन हेमके यांनी केले.तसेच कुष्ठांतेयांनी कुष्ठांतेयांच्या हक्कासाठी  काढलेली रॅली ही आजपर्यंत कधी न झालेली ऐतिहासिक  कुष्ठरोग जनजागृती रॅली  होती. असे सुध्दा मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष उमाकांत शेंडे अध्यक्ष सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था नागभीड,प्रमुख मार्गदर्शक डॉ.सचिन हेमके सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) गडचिरोली,डॉ.अमित साळवे तालुका आरोग्य अधिकारी गडचिरोली,डॉ.सिमा गेडाम वैद्यकीय अधिकारी,नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र,गोकुळनगर,   वच्छला मुनघाटे प्रादेशिक अधिकार मंच,  राजेंद्र ठोके कुष्ठरोग तंत्रज्ञ,महेश दंदे,उत्तम सूरनर, श्री कुनघाडकर आरोग्य सहाय्यक, संदीप माटे प्रकल्प समन्वयक, चक्रपाणी कोतकोंडावार सेवासदन हॉस्पिटल नागेपल्ली यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.रॅलीची सुरुवात डॉ.सचिन हेमके आणि डॉ साळवे यांनी हिरवी झेंडी दाखवून केली.सदर रॅली इंदिरा गांधी चौक येथून सुरुवात करून आठवडी बाजार ते गोकुळनगर पर्यंत काढण्यात आली. या रॅली मध्ये “हे घर कुष्ठ भेदभाव भयमुक्त आहे या घरातील कोणीही सदस्य कुष्ठांतेयांसोबत कसलाही भेदभाव करीत नाही”.असा संदेश देणाऱ्या घरकुल देखाव्याने गडचिरोली करांचे लक्ष वेधून घेतले तसेच  कुष्ठरोग विषयक नाऱ्यानी  व गाण्यानी गडचिरोली शहर दुमदुमले यावेळी महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मान्यवराच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.कुष्ठांतेयांनी विकृतीमध्ये सुधारणा आणून सन्मानित जीवन जगून समाज भेदभाव भयमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन डॉ अमित साळवे केले.आपण सर्व कुष्ठांतेयांनी कार्यक्रमात सहभागी होऊन स्वतः सक्षम झाले तसे समाजातील कुष्ठांतेयांचे मनोबल वाढवून त्यांना सुद्धा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन डॉ. सिमा गेडाम यांनी केले.कुष्ठांतेयांनी कसलीही भीती न बाळगता स्वाभिमानाने राहावे; असे मार्गदर्शन वच्छला मुनघाटे यांनी केले आणि कुष्ठांतेयांना लागणाऱ्या चप्पल साठी पाच हजार रुपये देणगी संस्थेला देण्याचे प्रतिपादन सुध्दा यावेळी वच्छला मूनघाटे यांनी केले. 

यावेळी सुरळीत व्यवसाय करून आर्थिक स्तराने सन्मानित जीवन जगत असलेले देवराव कोसरे यांचा सत्कार करण्यात आला.फूड ड्रॉप व मोबाईल क्ला बरा झालेले भाऊराव नारनवरे,मोबाईल क्ला बरा झालेले दयाराम भोयर,पायाची जखम बरी केलेले लालाजी करकाडे,किशोर बोरूले,नानाजी कुनघाडकर यांचा सत्कार करण्यात आला.तसेच पायाची बधिरता असलेल्या गरजू कुष्ठांतेयांना एम.सि.आर चप्पल चे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन शरद निकुरे,प्रास्ताविक मिलिंद बारसिंगे यांनी केले तर आभार नारायण उरकुडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीते करिता सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचे श्रावण हांडेकर,विनोद डोंगरवार,विद्या कांबळी,अश्विनी नन्नावरे,अलर्ट इंडिया मुंबईचे कविता रामटेके,दिवाकर सोनबावणे,लता तुनकलवार,मिना मेश्राम,श्रीकृष्ण निकुरे युवराज शेंडे,सपना कंकडालवार,वैशाली देशमुख,कविता बारसागडे यांनी सहकार्य केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!