- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देवदर्शनासाठी कारने जात असतांना वाटेतच कारची ट्रकला जोरदार धडक बसल्याने मुंबई पोलिसांच्या पोर्ट झोनमध्ये तैनात असलेले डीसीपी(DCP)सुधाकर पठारे यांचेसह परभणी येथील कंत्राटदार भागवत खोडके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार २९ मार्च रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास तेलंगणातील श्रीशैलमहून नगरकुर्लुणला जात असतांना घडली.पठारे हे प्रशिक्षणासाठी हैदराबादला गेले होते.अशातच आज शनिवारी पठारे व सहकारी ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात होते.
सुधाकर पठारे हे २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते.पठारे हे मूळचे वाळवणे,ता.पारनेर, जि.अहमदनगर येथील रहिवासी आहेत.आयपीएस होण्याअगोदर ते शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी म्हणून राहिले आहेत.ते ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची ट्रकसोबत धडक झाली आणि अपघात झाला.सुधाकर पठारे यांनी एमएससी (कृषी) आणि एलएलबी केले होते.१९९५ मध्ये स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर ते जिल्हा विशेष लेखापरीक्षक झाले.यानंतर, १९९६ मध्ये त्यांची विक्रीकर अधिकारी वर्ग १ म्हणून निवड झाली. १९९८ मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर ते पोलीस विभागात रुजू झाले.आतापर्यंत सुधाकर पठारे यांनी पंढरपूर, अकलूज,कोल्हापूर शहर, राजुरा येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून काम पाहिले आहे.त्यांनी चंद्रपूर,वसई येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि सीआयडी अमरावती येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.पठारे यांच्या अपघाताने पोलीस प्रशासनात शोककळा पसरली आहे.
- Advertisement -

