Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीकहाण्यांमध्ये मध्ये ट्विस्ट...! आज गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून डॉ.मिलिंद नरोटे आणि डॉ.देवराव होळींनी...

कहाण्यांमध्ये मध्ये ट्विस्ट…! आज गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून डॉ.मिलिंद नरोटे आणि डॉ.देवराव होळींनी दाखल केला अर्ज…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर होताच पक्षा अंतर्गत तिकीट मिळावी; याकरीता अनेकजण प्रयत्न करतांना दिसून येत आहेत.विविध पक्षांकडून काही जुन्याच उमेदवारांना तिकीट देण्यात आली आहे.तर काहींना ‘वेट अँड वाच’ च्या भूमिकेत ठेवण्यात आल्याने उमेदवारीसाठी अनेकांची धाकधूक वाढली आहे. अशातच गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात कहाण्यांमध्ये मध्ये ‘ट्विस्ट’ येऊ लागला आहे.त्यामुळे पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास बंड पुकरणार की काय?अशी चर्चा आता रंगू लागली आहे.काहीजण तिकीट मिळू नये; यासाठी नवनवीन हतकंडे वापरून उलट ‘त्यांना’ मोठी सहानुभूती मिळण्यास मदत करू लागले आहेत.
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक अंतर्गत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आज,गुरुवार २४ ऑक्टोंबर रोजी म्हणजेच तिसऱ्या दिवशी गडचिरोली विधानसभा मतदारसंघात दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत.डॉ.मिलिंद रामजी नारोटे (भारतीय जनता पार्टी) व डॉ.देवराव मादगुजी होळी (भारतीय जनता पार्टी) यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.आरमोरी व अहेरी या दोन विधानसभा मतदारसंघात आज एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. तर अहेरी या विधानसभा मतदारसंघात कालपर्यंत दोन अर्ज दाखल करण्यात आले आहे.त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण चार नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.आज २४ ऑक्टोबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून ६ व्यक्तींनी १६ नामनिर्देशन अर्जाची उचल केली तर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून ७ व्यक्तींनी १९ अर्जाची आणि अहेरी मतदारसंघातून ६ व्यक्तींकडून ९ अर्जाची उचल करण्यात आली आहे.जिल्ह्यात तीन दिवसात एकूण १३७ नामनिर्देश अर्जाची उचल झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत २९ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!