Wednesday, June 10, 2026
Homeगडचिरोलीएचटीबीटी कापूस बियाण्यांची अवैधरित्या साठवणूकीवर धाड; ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त..

एचटीबीटी कापूस बियाण्यांची अवैधरित्या साठवणूकीवर धाड; ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील रामसागर येथे संशयित अनधिकृत एचटीबीटी(HTBT) कापूस बियाण्यांची अवैधरित्या साठवणूक व विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने धाड टाकून मोठी कारवाई केली.या कारवाईत संशयित कापूस बियाण्यांची ३७ पाकिटे, सीलिंग मशीन तसेच कोरे पॅकेट असा एकूण ३५ हजार ४३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काल गुरुवारी करण्यात आलेल्या या कारवाईत कृषी विभागाच्या पथकाने सापळा रचून रामसागर येथील संशयित ठिकाणी छापा टाकला.यावेळी पुष्पा, बलवान व मालामाल या वाणांच्या संशयास्पद कापूस बियाण्यांची ३७ पाकिटे आढळून आली.यासोबतच बियाणे पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे सीलिंग मशीन आणि कोरे पॅकेटही जप्त करण्यात आले.जप्त बियाण्यांची किंमत ३३ हजार ९३७ रुपये असून सीलिंग मशीनची अंदाजे किंमत १ हजार ५०० रुपये असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
या प्रकरणी देवेंद्र सदाशिव वन्नेवार,रा.रामसागर यांच्या विरोधात चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी म्हणून कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण)चेतन चलकलवार यांनी तक्रार दिली आहे.आरोपीविरुद्ध बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८,बियाणे नियंत्रण आदेश १९८३, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई जिल्हास्तरीय भरारी पथकाने स्थानिक गुन्हे शाखा आणि चामोर्शी पोलीस स्टेशनच्या सहकार्याने केली.कारवाईत मोहीम अधिकारी आनंद पाल,जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम, कृषी अधिकारी चेतन चलकलवार तसेच पोलीस विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस. बनसोडे आणि पोलीस अंमलदार राहुल रामटेके यांनी सहभाग घेतला.
सदरची कारवाई कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.यामध्ये संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण)सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रविण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, कृषी विकास अधिकारी किरण खोमणे तसेच तालुका कृषी अधिकारी अमित तुमडाम यांचे मार्गदर्शन लाभल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!