Saturday, September 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तएका महिलेसह पुरुष नक्षलवाद्याचा खात्मा..

एका महिलेसह पुरुष नक्षलवाद्याचा खात्मा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील कुकानार जंगल परिसरात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत आज,बुधवार ११ जून रोजी दुपारच्या सुमारास एका महिलेसह पुरुष नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला असून दोघांपैकी एकाची पटलेली आहे.तो पेद्रास येथील स्थानिक संघटनेचा कमांडर होता.त्याच्यावर ५ लाखांचे बक्षीस होते.अश्यातच महिला नक्षलवाद्याची अजूनपर्यंत ओळख पटलेली नाही. चकमकीनंतर जंगल परिसरात शोध मोहीम राबवली असता सुरक्षा दलांना हत्यारे सापडली असून यामध्ये एक इन्सास रायफल,एक १२ बोर रायफल तसेच इतर शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.घटनेनंतर अतिरिक्त सहाय्यक पथके तैनात करण्यात आली आहेत.आज बुधवारी सकाळच्या सुमारास सुकमा जिल्ह्यातील कुकानार जंगल परिसरात काही नक्षलवादी घातपात करण्याच्या दृष्टीने दबा धरुन बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.माहितीच्या आधारे,कुकानार पोलिस ठाणे कर्मचारी आणि सुकमा डीआरजी यांचे संयुक्त पथक शोध मोहिमेसाठी दुपारी दोन वाजे रवाना झाले.शोध मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला.प्रत्युत्तरात जवानांनी गोळीबार करीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!