Tuesday, October 27, 2026
Homeगडचिरोलीउपाययोजनांचे सकारात्मक फलित; गडचिरोली जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये २७ टक्के घट..

उपाययोजनांचे सकारात्मक फलित; गडचिरोली जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये २७ टक्के घट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत गतवर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत २७ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.सन २०२५ मध्ये या कालावधीत १२१ जणांचा मृत्यू झाला होता,तर यंदा ही संख्या ८८ झाली आहे.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलीस विभागाने राबविलेल्या रस्ते सुरक्षा उपाययोजनांचे हे सकारात्मक फलित असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.
महाराष्ट्रातील रस्ते अपघातांच्या सप्टेंबर २०२६ अखेरच्या तुलनात्मक अहवालानुसार,जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत ३३ मृत्यू कमी नोंदविण्यात आले आहेत.जानेवारी ते सप्टेंबर २०२४ मध्ये जिल्ह्यात अपघातांत ११८ जणांचा मृत्यू झाला होता.मागील दोन्ही वर्षांच्या समान कालावधीच्या तुलनेत यंदा मृत्यूंची संख्या कमी झाली आहे.
अपघात प्रतिबंधासाठी जिल्हाभरात वाहनांचा वेग दर्शविणारे १५ ‘डायनॅमिक स्पीड इंडिकेटर’ बसविण्यात आले आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त ४० पोलीस अंमलदार उपलब्ध करून दिले आहेत.तसेच,अपघातप्रवण ३४ ठिकाणी रस्ते सुरक्षेसंबंधी दुरुस्ती व सुधारणा करण्यात आल्या असून वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
वाहन तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना अंगावर परिधान करता येणारे ‘बॉडी वॉर्न कॅमेरे’ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या आहेत.जिल्हाधिकारी पंडा यांनी या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने मार्गदर्शन व पाठपुरावा केला.परिवहन आणि पोलीस विभागाच्या समन्वयातून राबविलेल्या या प्रयत्नांमुळे अपघाती मृत्यू कमी होण्यास मदत झाल्याचे मोरे यांनी सांगितले.
राज्यस्तरीय आकडेवारीनुसार,जानेवारी ते सप्टेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्रात रस्ते अपघातांत ११ हजार ९१२ जणांचा मृत्यू झाला होता.सन २०२६ मध्ये याच कालावधीत ही संख्या ११ हजार ३२६ झाली आहे. राज्यातील सुमारे ५ टक्के घटीच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील २७ टक्के घट लक्षणीय आहे.
रस्ते सुरक्षेसाठी प्रशासकीय प्रयत्नांबरोबरच वाहनचालकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. वाहनचालकांनी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा, वेगमर्यादेचे पालन करावे,मद्यप्राशन करून वाहन चालवू नये आणि वाहन चालवितांना मोबाईलचा वापर टाळावा. वाहतूक नियमांचे पालन करून प्रत्येकाने अपघात प्रतिबंधासाठी योगदान द्यावे,असे आवाहन मोरे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी; आधारभूत धान खरेदीसाठी २० केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ धान खरेदी केंद्रांना...

चित्तथरारक घटना..! दोन वाघांची दुचाकीवर झडप; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यातून एक चित्तथरारक घटना समोर आली आहे.रात्रीच्या अंधारात जंगलमार्गे दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीवर दोन वाघांनी झडप घालून तरुणाला ठार केल्याची घटना...

उद्याला गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने  उद्या,बुधवार २८ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.तर चंद्रपूर, गोंदिया,नागपूर,वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये...

२७ वर्षीय तरुणाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा; आज सकाळची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नगर परिषद हद्दीत येणाऱ्या नैनपूर येथील एका २७ वर्षीय तरुणाने घरी कुणीही नसतांना स्वतःच्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!