Thursday, August 20, 2026
Homeगडचिरोलीउद्याला गडचिरोलीत ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’; नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन..

उद्याला गडचिरोलीत ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’; नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जलसंवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उद्या,शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमात विद्यार्थी,युवक, शासकीय अधिकारी,कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंवर्धनाचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
महा वॉकेथॉनच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला.यावेळी मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाची रूपरेषा सादर केली.कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांच्या सुरक्षिततेसह सर्व आवश्यक व्यवस्था चोख ठेवून कार्यक्रम यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिले.
कार्यक्रमाची सुरुवात उद्या २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता इंदिरा गांधी चौक येथून होणार असून सुमारे तीन किलोमीटर अंतराची ही वॉकेथॉन जिल्हा क्रीडा संकुल,पोटेगाव रोड,गडचिरोली येथे पूर्ण होईल. त्यानंतर त्याच ठिकाणी विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरक्षित व सुरळीत आयोजनासाठी पोलीस विभागाचे सहकार्य घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पंडा यांनी दिल्या.तसेच अग्निशमन वाहनाची व्यवस्था ठेवावी आणि सहभागी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही,याची विशेष दक्षता घ्यावी,असेही त्यांनी सांगितले.संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
‘पाणी अडवा,पाणी जिरवा,जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे या उपक्रमाचे घोषवाक्य आहे.महा वॉकेथॉनच्या माध्यमातून पाणी बचत,जलसंधारण आणि उपलब्ध जलस्रोतांच्या योग्य वापराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.कार्यक्रमातील सहभागींना टी-शर्ट,कॅप, बॅज तसेच ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
  • रील्स स्पर्धेचेही आयोजन👇
महा वॉकेथॉनच्या अनुषंगाने मृद व जलसंधारण विभागामार्फत रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेसाठी रील अपलोड करण्याचा कालावधी १५ ते २१ ऑगस्ट २०२६ असा आहे.या स्पर्धेच्या माध्यमातूनही जलसंवर्धनाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
जलसंवर्धनाबाबत व्यापक लोकसहभाग निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिक,विद्यार्थी,युवक तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी QR कोड स्कॅन करून स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीला मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र कोठेकर व विविध विभागांचे विभागप्रमुख व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अवैध रेतीची वाहतूक; ट्रकसह दोघांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या उपविभाग राजुरा पथकाने आज,गुरुवार २० ऑगस्ट रोजी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती वाहतुकीवर मोठी केली.कारवाईत तब्बल ४०...

आश्रमशाळेतील गैरप्रकार प्रकरणी आरोपी शिपायास पोलिस कोठडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसागोंदी येथील निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसोबत कथित गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपावरून आश्रमशाळेच्या नाइट वॉचमनला कोंढाळी...

आता महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालविण्यासाठी व्यावहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-आता महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालविण्यासाठी व्यावहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे.मराठी बोलता येत नसलेल्या चालकांना आज गुरुवारपासून नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू...

ग्रामसेवकांचा राज्यातील सर्व नियोजित ग्रामसभांवर बहिष्काराचा निर्णय.. – ग्रामसभेदरम्यान ग्रामसेवकाचा झाला होता मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे ग्रामसभेदरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे  ग्रामपंचायत अधिकारी(ग्रामसेवक)पी.एन.पाटील वय ५४ वर्षे यांना तीव्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!