- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे.त्यानूसार गडचिरोली जिल्ह्यातील ६७-आरमोरी,६८-गडचिरोली व ६९-अहेरी या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या तीनही विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूकीची अधीसुचना उद्या दिनांक-२२ ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक-२२ ऑक्टोंबर ते २९ ऑक्टोंबर (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूकीचे नामनिर्देशनपत्र संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात स्विकारण्यात येणार आहेत.तसेच दिनांक ३० ऑक्टोंबर ला सकाळी ११ वाजता नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येईल.उमेदवारी मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरच्या दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत असून,२० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत मतदान घेण्यात येईल.मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ ला होणार आहे.
वरीलप्रमाणे निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे संबंधीत विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
- Advertisement -

