Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तइडीचे पाचवे समन्स केजरीवालांना -मद्य घोटाळा प्रकरण….

इडीचे पाचवे समन्स केजरीवालांना -मद्य घोटाळा प्रकरण….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) यांनी आज दिनांक-३१ जानेवारी रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा समन्स बजावले.या प्रकरणी केजरीवालांसाठीचे हे पाचवे समन्स आहे.२ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहावे; असे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान, केजरीवाल यांनी हा सर्व प्रकार राजकीय षड्यंत्र सुरु आहे; असा आरोप केला आहे.दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी यापूर्वी ‘ईडी’ने १७ जानेवारी,३ जानेवारी,२१ डिसेंबर आणि २ नोव्हेंबर रोजी केजरीवाल यांना समन्स पाठवले होते; परंतु केजरीवाल प्रत्येकवेळी गैरहजर राहिले आहेत

यापूर्वी ईडीने पाठवलेल्या समन्सबाबत अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला होता की, राजकीय कटाचा भाग म्हणून त्यांना समन्स पाठवले जात आहेत.तथाकथित अबकारी प्रकरणाचा तपास गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे.या दोन वर्षांत त्यांना काहीच मिळाले नाही.किती पैसे वसूल झाले,सोने किंवा जमिनीची कागदपत्रे कुठेही सापडली का?असे अनेक प्रश्नही अनेक न्यायालयाने ईडीला विचारले आहेत; पण ईडीला कुठेही काहीही सापडलेले नाही. भाजपला स्वतःच्या कामावर नव्हे तर सीबीआय-ईडीचा वापर करून निवडणुका जिंकायच्या आहेत; असाही आरोपही त्यांनी केला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!