Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीहनीट्रॅप प्रकरणी मोठा खुलासा…-शासकीय अभियंत्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून १० लाखाच्या खंडणी मागणीचे...

हनीट्रॅप प्रकरणी मोठा खुलासा…-शासकीय अभियंत्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून १० लाखाच्या खंडणी मागणीचे प्रकरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- शासकीय अभियंत्याला नागपूर येथे हनी ट्रॅपमध्ये अडकवून १० लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी तरुणी,पत्रकार, पोलिस शिपायासह चौघांच्या गडचिरोली पोलिसांनी नागपूर येथे मुसक्या आवळल्या.सद्यस्थितीत चारही आरोपींना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गडचिरोली पोलिसांच्या शिस्तबद्ध तपासाअंती खंडणीबहाद्दरांची मोठी टोळी सक्रिय असून त्यांनी आठ ते दहा जणांना अशाचप्रकारे जाळ्यात ओढल्याचे समोर येत आहे. याच प्रकारे खंडणी वसूल करणारे १५ पत्रकार व फोटोग्राफर जिल्हा पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात कार्यरत अभियंत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून खंडणी मागितल्या प्रकरणी पत्रकार रविकांत कांबळे,पोलिस शिपाई सुशील गवई,रोहित अहिर व इशानी या चौघा जणांच्या टोळीला गडचिरोली गुन्हे शाखेच्या पथकाने २९ जानेवारी रोजी नागपुरातून ताब्यात घेतले होते. तर एक महिला आरोपी पसार होण्यात यशस्वी झाली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलिस ठाण्याचे ठाणेदार अरुण फेगडे यांनी तपासाला गती दिली आहे.पैसे उकळण्याच्या डावात नागपूर येथील पत्रकारासह पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.याच पद्धतीने या टोळीने किती जणांना जाळ्यात ओढले या दिशेने तपास केला असता या टोळीमध्ये अनेकांचा समावेश असल्याचे दृष्टीस आले आहे.या टोळीद्वारे आतापर्यंत ८ ते १० नागरिकांना जाळ्यात अडकवून खंडणी वसूल केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.यामुळे नागपूर येथील पत्रकारांसह, फोट्रोग्राफर असे १५ जण पोलिसांच्या रडारवर आले असून लवकरच त्यांच्या मुसक्या आवळल्या जाऊ शकतात.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!