Friday, October 23, 2026
Homeगडचिरोलीआरोग्य विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचा गौरव...

आरोग्य विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचा गौरव…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व जंगलव्याप्त आहे.जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता अती दुर्गम भागात आरोग्य सेवा देत असतांना अडी-अडचणींना तोंड द्यावे लागते.या सगळ्या गोष्टींवर मात करून मुख्यालयी राहून आरोग्य सेवा देणारे तसेच आरोग्य कार्यक्रम प्रभावीपणे राबवणारे  अधिकारी व कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
यामध्ये सहपालक मंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते डॉक्टर दुर्गा जराते वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र जीमलगट्टा,श्रीमती छाया तोडासे आरोग्य सेविका प्रा.आ.केंद्र मानेवारा,डोमा वणकर आरोग्य सेवक प्रा. आ.केंद्र लाहेरी,सुनील चापले सांखिकि अन्वेषण जिल्हा परिषद,संगीता पुनगाटी आशा स्वयंसेविका प्रा. आ.केंद्र आरेवाडा यांना गौरविण्यात आले.याप्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,खासदार डॉ.नामदेव किरसान,आमदार डॉ.मिलिंद नरोटे,जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल,जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच जिल्हा परिषद गडचिरोली येथे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्या हस्ते आरोग्य विभागातील डॉक्टर पवनकुमार राहेरकर प्रा.आ.केंद्र गट्टा, कु. अश्विनी मेंढे जिल्हा कार्यक्रम समन्वयक,चंदू वाघाडे जिल्हा कार्यक्रम सहाय्यक यांनाही गौरविण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिध्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ योजना सुरु केली आहे.या योजनेतंर्गत १ एप्रिल...

जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत.. -अप्रमाणित संदेशांवर शेतकरी व नागरिकांनी विश्वास ठेवू नये; जिल्हा परिषदेच्या संबंधित...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत तसेच ते जप्त करण्याबाबत कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत, असा खुलासा...

अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली; पीएम किसान योजनेचे दोन हजार येणार बँक खात्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशातील कोट्यवधी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असून प्रतीक्षा संपली आहे.येत्या,शुक्रवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!