- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आज,सोमवार १५ डिसेंबरला नागपूर येथील ‘एम्स'(AIIMS)च्या ऑडिटोरियममध्ये गुरुवार ११ डिसेंबर रोजी आयोजित महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला असून आयुष्यमान भारत(PMJAY- MJPJAY) गोल्डन कार्ड नोंदणीच्या कामगिरीत गडचिरोली जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.या महत्त्वपूर्ण यशामागे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे सक्रिय मार्गदर्शन आणि नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरले असून त्यांनी दुर्गम भागांपर्यंत गोल्डन कार्ड पोहोचवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला प्रभावी दिशा दिली,ज्यामुळे हे अभियान यशस्वी झाले.त्यासोबतच गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी या अभियानाच्या यशामध्ये मोठे योगदान दिले असून त्यांनी तालुकास्तरावरील तसेच ग्रामपातळीवरील नियोजन करून सर्व विभागांचा यामध्ये सहभाग नोंदवून घेतला आणि अभियानात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी टीमला प्रेरित केले.मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे म्हणाले की, “अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्गम भागात अथक परिश्रम घेतल्यामुळेच आम्ही आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड नोंदणीत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवू शकलो. आमची टीम यापुढेही नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध असेल.” तसेच त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या शुभहस्ते गडचिरोली टीमला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सन्मानित अधिकारी👇
डॉ.प्रताप शिंदे (जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली),डॉ.माधुरी किलनाके (जिल्हा शल्य चिकित्सक,गडचिरोली),डॉ.सुमेध चाटसे (जिल्हा समन्वयक,गडचिरोली)
मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात,गट विकास अधिकारी(BDO) यांच्यासह आशा(ASHA),ANM,MPW,MMU, UHWC,MO,CHO,THO,MJPJAY PMJAY co-ordinator आणि आरोग्य सेवेतील इतर सर्व कर्मचाऱ्यांचे सामूहिक समर्पण या यशात अमूल्य ठरले आहे.
यावेळी,गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य विभागात अति दुर्गम भागात मुख्यालयी राहून उल्लेखनीय व उत्कृष्ट काम करणाऱ्या खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला:
डॉ.मनीष धकाते(तालुका आरोग्य अधिकारी)
डॉ.संजय सुपारे(वैद्यकीय अधिकारी,देलनवाडी)
स्वप्निल येरमे(आरोग्य सेवक,कोठी,ता.भामरागड)
करुणा सडमेक(आरोग्य सेविका,उपकेंद्र हालेवारा)
ललिता तिम्मा(आशा स्वयंसेविका,कुवाकोडी, भामरागड)
उपस्थित मान्यवर: या कार्यक्रमास डॉ.निपुण विनायक,सचिव(१),ई.रवींद्रन,सचिव(२),संचालक डॉ. नितीन अंबाडेकर,डॉ.विजय कंदेवाड संचालक,पुणे, डॉ.शशिकांत शंभरकर,उपसंचालक,आरोग्य विभाग नागपूर,राज्य क्षयरोग अधिकारी सांगळे तसेच विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
- Advertisement -

