Tuesday, September 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार की २१०० रुपये.. - 'या' दिवशी...

आता लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार की २१०० रुपये.. – ‘या’ दिवशी खात्यात होणार जमा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ गेम चेंजर ठरल्याने, महायुती सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आले.लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्याने,महायुतीला विक्रमी विजय साजरा करणे शक्य झाले.आता लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतिक्षा असून,तो खात्यात कधी जमा होणार याची चर्चा रंगत आहे.आतापर्यंत या योजनेचे बहिणींच्या खात्यात पाच हप्ते जमा झाले आहेत.
जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत मुदतीपर्यंत २ कोटी ४० लाख महिला पात्र ठरल्या असून,एक कोटी ६० लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता पात्र महिलांच खात्यात जमा करण्यात आला होता.त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला. तसेच नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागणार असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात जमा केले.त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत पाच हप्त्यांचे साडेसात हजार जमा झाले आहेत.
दरम्यान,आचारसंहिता काळात योजनांचा लाभ देता येत नसल्याने,निवडणूका संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते. त्यामुळे आता निवडणुका संपल्या असून,लाडक्या बहिणींच्या खात्यात सहावा हप्ता कधी जमा होणार? याची बहिणींना प्रतिक्षा लागून आहे.येत्या २९ नोव्हेंबर रोजी बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे.
प्रचारादरम्यान,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ‘लाडकी बहिण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकू नयेत म्हणून नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोंबरमध्येच दिला आहे.२० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबर निकाल लागला.त्यामुळे डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच येणार आहेत.पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारांवरून २१०० रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते.आता महायुतीचे सरकार आल्याने,लाडकी बहीण योजनेचा हप्ता २१०० रुपये होणार काय? अशीही बहिणींमध्ये चर्चा रंगत आहे.दरम्यान,हा धोरणात्मक निर्णय असल्याने कॅबिनेटच्या बैठकीतच याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित असल्याने,डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये दिल्यास तो दीड हजारांप्रमाणेच दिला जाण्याची शक्यता आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक,सहकार व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा संकल्प फाउंडेशनतर्फे गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या गेवर्धा येथे आज,सोमवार १४ सप्टेंबर रोजी संकल्प फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे सामाजिक,सहकार व शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गावातील तीन...

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-परंपरेचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षण यांचा समतोल साधणे ही सामूहिक जबाबदारी आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेतांना पर्यावरणाची हानी होणार नाही,याची काळजी घेणे...

अतिवृष्टीग्रस्त कुटुंबीयांना १ लाख ३० हजाराची आर्थिक मदत वितरित.. -भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या पाठपुराव्याला यश..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-अतिवृष्टीमुळे घर कोसळून नुकसान झालेले कुरखेडा शहराच्या गांधी वार्डातील ज्येष्ठ नागरिक नरेश हडप यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून १ लाख ३० हजारांची आर्थिक मदत...

अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा मृत्यू; तर कुंपणात अडकून बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन वन्य प्राण्यांचा मृत्यू झाल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तावशी संभाजीनगर महामार्गावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!