Saturday, July 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता रोजगार हमीच्या मजुरांना मिळणार प्रतिदिन ३१७ रुपये मजुरी..

आता रोजगार हमीच्या मजुरांना मिळणार प्रतिदिन ३१७ रुपये मजुरी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव आता “विकसित भारत रोजगार आजिविका मिशन ग्रामीण” असे करण्यात आले असून आता ग्रामीण भागातील कुटुंबांना वर्षातून १२५ दिवस रोजगार मिळणार आहे.विशेष म्हणजे, योजनेचा केंद्रबिंदू ग्रामीण परिसर असल्याने कामांचे नियोजन,देखरेख आणि सनियंत्रणाची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतींकडे सोपवण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेचा पंचायत समिती स्तरावर स्वतंत्र विभाग कार्यरत असून २५ लक्ष रुपयांपर्यंतच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार बीडीओंना देण्यात आले आहेत.तर अकुशल आणि कुशल कामांचे प्रमाण ६० आणि ४० च्या रेशोमध्ये असणे बंधनकारक आहे.अश्यातच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार रोजगार हमी योजनेच्या अकुशल मजुरांच्या मजुरीत पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे.या निर्णयामुळे आता मजुरांना प्रतिदिन ३१२ रुपयांऐवजी ३१७ रुपये मजुरी मिळणार आहे. सदरची दरवाढ ही १ जुलैपासून महाराष्ट्रभर राज्यभर लागू झाली आहे.पण, एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडलेल्या असतांना मजुरीच्या दरात झालेली अल्प वाढ ही मजुरांची थट्टा करणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.याव्यतिरिक्त  मोजमापानुसार मजुरी मिळत नसल्यामुळे मजुरांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कामाच्या तुलनेत मिळणारी मजुरी अपुरी वाटत असल्याने अनेक मजूर आता या योजनेच्या कामापासून दूर जाणे पसंत करीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात निर्माण झाले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गोसीखुर्द जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ; धरणाचे ३३ दरवाजे खुले..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या विविध भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोसीखुर्द धरण जलाशयाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.पाण्याचा वाढता साठा लक्षात घेता प्रशासनाने धरणातील...

‘तुझा मर्डर करेन तर मीच करेन’, अशी उघड धमकी देणाऱ्या पत्नीनेच केला नवऱ्याचा गेम..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन दिवसांपूर्वी रात्री झालेल्या मर्डर मिस्ट्रीचा अखेर उलगडा झाला.एका कार्यक्रमात कुख्यात गुन्हेगार असलेल्या नवऱ्याने पत्नीसोबत अपमानास्पद व्यवहार केल्याने संतप्त झालेल्या पत्नीने 'तुझा...

आकस्मिक निधनानंतर लाभार्थी कुटुंबाला २ लाख रुपयांची विमा मदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आर्थिक साक्षरतेबरोबरच सामाजिक सुरक्षा योजनांबाबत प्रभावी जनजागृती केल्यास नागरिकांना संकटाच्या काळात मोठा आर्थिक आधार मिळू शकतो,याचा प्रत्यय गडचिरोली तालुक्यात आला आहे.प्रधानमंत्री...

उद्याला गडचिरोलीत मोफत हृदय तपासणी शिबिर; तपासणीनंतर मुंबईत होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ० ते १८ वर्षांतील जन्मजात हृदयविकार तसेच इतर हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त बालकांसाठी उद्या,रविवार ५ जुलै २०२६ रोजी जिल्हा महिला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!