Friday, October 9, 2026
Homeगडचिरोलीआता रोजगार हमीचे ई-मस्टर निघणार ग्रामपंचायत स्तरावरूनच.. - ग्रामरोजगार सेवकांची जबाबदारी वाढणार...

आता रोजगार हमीचे ई-मस्टर निघणार ग्रामपंचायत स्तरावरूनच.. – ग्रामरोजगार सेवकांची जबाबदारी वाढणार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-रोजगार हमी योजनेअंतर्गत गावातील नागरिकांना गावातच काम मिळू लागल्याने बाहेर ठिकाणी रोजगारासाठी होणाऱ्या भटकंतीचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले आहे.गावातील ग्रामरोजगार सेवक कामाची मागणी करणाऱ्या मजुरांची यादी तयार करून,तालुक्याच्या ठिकाणी जाऊन,पंचायत समितीतील पंचायत स्तर व तहसील कार्यालयातील यंत्रणा स्तरावरून मजुरांचे हजेरी पत्रक काढण्यासाठी वारंवार जायचे; अशातच शासनाने आता बदल करीत
 ग्रामपंचायत स्तरावरुनच हजेरीपट(ई-मस्टर)निर्गमित करण्याचे आदेश काढले आहे.
सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यातील ३५ तालुक्यात सदरची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.तर राज्याच्या उर्वरित तालुक्यात लवकरच याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने ग्रामरोजगार सेवकांची जबाबदारी वाढणार आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावरील हजेरीपट प्रचलित पद्धतीप्रमाणे न काढता त्यासाठी ग्रामपंचायतीला प्राधिकृत करणे व ग्रामपंचायत पातळीवरच ई-मस्टर निर्गमित करण्याची कार्यवाही आपले सरकार पोर्टलमार्फत करण्याबाबतची कार्यपद्धती सुरू आहे.त्यामुळे वेळेच्या बचतीसह ‘रोजगार हमीचे काम अन् थोडे दिवस थांब’ यावर आळा घातला जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ‘या’ जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटाच्या दरम्यान ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के...

गडचिरोली जिल्ह्यात चारा वाहतूक व विक्रीवर बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी आणि भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊ नये,यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत अथवा राज्याबाहेर...

शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथील ५३ वर्षीय शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर...

अनियमितता भोवली; कुरखेडा तालुक्याच्या पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या विविध विकास कामांच्या निधीत तसेच अर्थसंकल्पीय तरतूदी शिवाय नियमबाह्य जादादर लावून खर्च करणे,खरेदी केलेल्या साहित्यांच्या नोंदी साठापंजीला न घेणे,विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!