Monday, May 18, 2026
Homeमुंबईआता नगर परिषद,नगर पंचायतीच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार नगरसेवकांना...

आता नगर परिषद,नगर पंचायतीच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार नगरसेवकांना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्यातील नगर परिषद,नगर पंचायती, औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार आता नगरसेवकांना बहाल करण्यात येणार आहे.यासाठी राज्यात सध्या कार्यरत असलेल्या १०५ नगर परिषद,नगर पंचायती आणि औद्योगिक नगरींसाठी हा निर्णय लागू असणार आहे. त्यासाठी तातडीने अध्यादेश काढून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या बैठकीत महाराष्ट्र नगर परिषदा,नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.या सुधारणेनुसार नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा अधिकार निवडून आलेल्या नगरसेवकांना असणार आहे.निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येपैकी दोन तृतीयांश संख्येने नगरसेवकांच्या सह्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवता येईल.त्या प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांना १० दिवसांच्या आता विशेष सभा आयोजित करून मतदानाद्वारे निर्णय घ्यावा लागेल.अधिनियमातील सुधारणाविषयक विधेयक राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
यापूर्वी नगराध्यक्षांना पदावरून बाजूला सारण्याचा प्रक्रियेत निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी ५० टक्के नगरसेवकांच्या सह्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जात असे.त्यानंतर राज्य सरकारच्या स्तरावर ही कार्यवाही करून नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याची कारवाई केली जात होती.आता राज्य सरकारने आपले अधिकार सध्या अस्तित्वात असलेल्या १०५ नगर परिषदा,नगर पंचायती आणि औद्योगिक नगरीच्या लोकनियुक्त नगरसेवकांना दिले आहेत.या १०५ स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत येत्या दोन वर्षांत संपत आहे. रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लवकर घेण्याची लगबग सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यावर्षी दिवाळीनंतर या निवडणुका लागण्याची शक्यता आहे.महापालिका,नगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुका लवकर घेण्याची मागणी स्थानिक पातळीवरील पदाधिकारी,नेत्यांकडून केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वऱ्हाडांवर काळाचा घाला; ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात १३ जण ठार.

उद्रेक न्युज वृत्त :-साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांवर काळाने झडप घातल्याची घटना आज, सोमवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घडली.ट्रक आणि कंटेनरच्या भीषण...

औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या,बुधवार २० मे २०२६ रोजी संपूर्ण भारतभर...

येत्या गुरुवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा; आपली मते,तक्रारी व संबंधित बाबी थेट समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नागरिकांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा येत्या,गुरुवार २१ मे २०२६ रोजी सकाळी ११...

वाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!