Wednesday, October 7, 2026
Homeगडचिरोलीआता तालुकास्तरावरच मिळणार तात्पुरते फटाका सेंटरचे परवाने..

आता तालुकास्तरावरच मिळणार तात्पुरते फटाका सेंटरचे परवाने..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आता व्यावसायिकांना जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही.अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा अधिकार तालुकास्तरावर दिला असून, संबंधित तहसीलदार तथा तालुका दंडाधिकाऱ्यांना परवाने निर्गमित करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.
दिवाळीच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तात्पुरते फटाके स्टॉल्स लावले जातात.यासाठी परवाना मिळवण्यासाठी जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील अर्जदारांना गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या.ही समस्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रशासकीय विकेंद्रीकरणाचा निर्णय घेत संबंधित तहसीलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी हे अधिकार दिले आहेत.
त्यामुळे फटाका विक्री परवाना घेऊ इच्छिणाऱ्या स्थानिक अर्जदारांनी जिल्हा मुख्यालयात न येता, आपल्या संबंधित तालुका तहसील कार्यालयाशी संपर्क साधून रीतसर अर्ज व पुढील आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी,असे आवाहन जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये देशात प्रथम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीच्या एकूण डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.कृषी...

राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाचा सर्पदंशाने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ)जवानाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज,मंगळवार ६ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस मदत...

कोरची तालुक्यातील सीताफळ-जांभूळ उत्पादनाला चालना देण्यासाठी रोपवाटिका,प्रक्रिया केंद्र व शीतगृह उभारावे.. -आमदार रामदास मसरामांची कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा मतदारसंघातील कोरची तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या सीताफळ व जांभूळ या फळपिकांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी तालुक्यात अद्ययावत रोपवाटिका,शेतकरी...

मंत्रिमंडळ निर्णय; आता पोलिसांच्या साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ योजना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावतांना जोखीम पत्करून केलेल्या साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ देण्याच्या योजनेस आज,मंगळवार ६ ऑक्टोंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!