Monday, May 4, 2026
Homeगडचिरोलीआठवीच्या विद्यार्थिनीने घरातच घेतला गळफास….

आठवीच्या विद्यार्थिनीने घरातच घेतला गळफास….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- कुटूंबियांनी रागावल्याने आठव्या वर्गातील विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गडचिरोली शहरातील वनश्री कॉलनीत शनिवारला सायंकाळच्या सुमारास घडल्याने कुटूंबियांना धक्का बसला आहे. आर्या भास्कर बांबोळे वय १५ वर्षे वनश्री कॉलनी गडचिरोली असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार,आर्या ही नवेगाव येथील नवजीवन पब्लिक स्कूल येथे इयत्ता आठव्या वर्गात शिकत होती.शनिवारला आर्याच्या आईवडिलांनी तिला काही कारणासाठी रागावले.त्यामुळे नाराज झालेल्या आर्याने सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घरातच गळफास घेवून आत्महत्या केली.घटनेच्या वेळी आर्याचे वडिल नोकरीवर गेले होते तर आई आर्याच्या लहान भावाला शिकवणीतून आणण्यासाठी गेली होती.हीच संधी साधून आर्याने हे टोकाचे पाऊल उचलले.लहान मुलाला घेवून आई घरी येताच घटना उघडकीस आल्याने आईने एकच हंबरडा फोडला. घटनेची माहिती गडचिरोली पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रानडुकराचा हल्ला; जखमीवर तात्काळ उपचार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुल्ला पिडसे या जखमी रुग्णाला शासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे वेळेवर उपचार मिळाले आहेत.जंगलव्याप्त...

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

उकाड्यापासून मिळणार दिलासा; मेघगर्जनेसह पाऊस,विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतांनाच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता या कडक उन्हातून...

भीषण अपघातात तरुण कंत्राटदाराचा मृत्यू; देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंजवरून कामे आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा(ठेकेदार)भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!