Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीआज मार्कंडा येथे शिवभक्तांचा जनसागर; पहा लाईव्ह दर्शन..

आज मार्कंडा येथे शिवभक्तांचा जनसागर; पहा लाईव्ह दर्शन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर आज,बुधवार २६ फेब्रुवारीला हजारो भक्तगणांनी महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली.या मंगलमय सोहळ्याची सुरुवात आमदार डॉ.मिलिंद नरोटे,डॉ.वैशाली नरोटे आणि हरणघाट हनुमान मंदिराचे संत मुर्लीधर महाराज यांच्या हस्ते महापूजेने झाली.या पूजेसाठी पुजारी पंकज पांडे,शुभांगी पांडे,प्रफुल भांडेकर, वैशाली भांडेकर,संतोष दीक्षित आणि सौ.दीक्षित हे यजमान होते.मंत्रोच्चारांच्या गजरात पुजारी नाना महाराज आमगावकर यांनी विधिवत पूजा संपन्न केली.
या कार्यक्रमास चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी रणजित यादव,गट विकास अधिकारी सागर पाटील, नायब तहसीलदार तारेश फुलझेले,मंडळ अधिकारी नवनाथ अतकरे,देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड,सहसचिव रामूजी पाटील तिवाडे तसेच स्थानिक प्रशासन आणि विविध मान्यवर उपस्थित होते.याशिवाय माजी आमदार डॉ.देवराव होळी,दिलीप चलाख,जयराम चलाख यांनी मंदिरात  दर्शन घेतले.
मार्कंडादेव लाईव्ह दर्शन👇
 
शासनाच्या सहभागाने भाविकांना उत्तम सुविधा👇
महाशिवरात्रीच्या निमित्ताने मार्कंडादेव येथे लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले.दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या,ज्यांची लांबी तब्बल दोन किलोमीटरपर्यंत पोहोचली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन व मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी उत्कृष्ट सोयीसुविधा करण्यात आल्या होत्या.स्तनदा माता,अपंग व्यक्ती, गरोदर महिला आणि वृद्ध भक्तांसाठी विशेष सोय केली गेली होती.तसेच भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाणीपुरवठा,स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.पोलीस,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन,आरोग्य विभागाचे पथक भाविकांच्या सोयीसाठी तैनात ठेवण्यात आले आहे.यासोबतच महापूजेचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह दर्शन) उपलब्ध करून दिले आहे,जेणेकरून प्रत्यक्ष मंदिरात हजर न राहू शकणाऱ्या भक्तांना घरबसल्या दर्शन घेता येईल.
शिवभक्तांचा उत्साह👇
महाशिवरात्र हे मार्कंडादेव मंदिरासाठी विशेष पर्व असून,मागील तीन दिवसांपासून येथे लाखोंच्या संख्येने भाविक भक्त गर्दी करीत असतात.आज बुधवारी पहाटेपासूनच मंदिर परिसरात ‘हर हर महादेव’ च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले.दर्शनासाठी हजारो शिवभक्तांनी सहनशीलतेने रांगेत उभे राहून आपल्या श्रद्धेचा भाव व्यक्त केला.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनामुळे भाविकांना कोणतीही गैरसोय न होता दर्शन घेता आले.त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिभावाने आणि भक्तांच्या उत्साहाने गजबजून गेला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!