Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीआज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असून त्याचे केंद्र गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याचे प्राथमिक माहितीत दर्शविण्यात आले आहे.
अहेरी तालुक्यातील अहेरी व नागेपल्ली परिसरातही हे धक्के जाणवल्याची माहिती अहेरी तहसील प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेण्यात येत आहे.सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती प्राप्त झालेली नाही.
नागरिकांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे घाबरून जाऊ नये.शांतता राखून आवश्यक ती दक्षता बाळगावी.तसेच भूकंपासंदर्भातील अफवा अथवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये.प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!