- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे असल्याने पावसाच्या पाण्याचा प्रवाह नाल्यांवरून होऊ लागला आहे.त्यामुळे,आज रविवार २३ ऑगस्ट रोजी पुरामुळे दोन मार्ग बंद पडली आहेत.यात कोरची तालुक्यातील
कोरची ते बोटेकसा रस्ता राज्यमार्ग-३१४(भिमपूर नाला) व कुरखेडा तालुक्यातील काढोली ते उराडी रस्ता प्रजिमा क्रमांक सातचा समावेश आहे.त्यातच,गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातील बेडगाव महसूल मंडळात सर्वात जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.या ठिकाणी ७९.४ मिमी पावसाची नोंद झाली असून त्या पाठोपाठ मुलचेरा येथे ७८.२ मिमी पाऊस, कोरची येथे ७१.६ तर कोरची तालुक्यातील मसेली येथे ६८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात आज रविवारच्या सकाळपासूनच पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील आणखी काही मार्ग बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- Advertisement -

