Monday, May 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज आगामी निवडणुकांचे बिगुल वाजणार.. - नागपूर,चंद्रपूर महापालिकांबाबत संभ्रम..

आज आगामी निवडणुकांचे बिगुल वाजणार.. – नागपूर,चंद्रपूर महापालिकांबाबत संभ्रम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे येत्या २१ डिसेंबरला मतदानाचे निकाल घोषित होणार आहेत. अश्यातच आता पुढील महानगर पालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे.त्यानुसार,आज,सोमवार १५ डिसेंबरला राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे दुपारी ४ वाजता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.सदरची पत्रकार परिषद मुंबईमधील मलबार हिल येथील सह्याद्री अतिथिगृहामध्ये दुपारी ४ वाजता पार पडणार आहे.
माहितीनुसार,सर्वप्रथम राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणुका पार पडणार असून दोन महापालिकांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. नागपूर,चंद्रपूर या दोन महापालिकांची निवडणूक आरक्षण मर्यादेच्या मुद्यामुळे नंतर होईल आणि अन्य २७ महापालिकांची निवडणूक एकत्रित होईल,असे म्हटले जात असले तरी सर्व २९ महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. साधारणतः जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात त्यासाठीचे मतदान होईल,असे म्हटले जात आहे.नागपूर आणि चंद्रपूर या दोनच महापालिका अशा आहेत की,जिथे ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे.त्यामुळे येथे आधी ५० टक्क्यांच्या आत आरक्षण दिले जाईल, अशा पद्धतीने पुनर्रचना करून मगच तेथे निवडणूक घेतली जाईल,असा तर्क होता.मात्र, आयोगाच्या सूत्रांनी त्यास नकार दर्शवून ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे,अशा ठिकाणी निवडणूक घेऊ नये,असे न्यायालयाने निकालात कुठेही म्हटलेले नाही.ही मर्यादा ओलांडलेल्या महापालिकांमध्ये निवडणूक घेता येईल आणि निकालदेखील जाहीर करता येईल; पण हा निकाल ओबीसी आरक्षण आणि ५० टक्क्यांची ओलांडलेली मर्यादा याबाबत न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल. त्यामुळे सर्व २९ महानगर पालिकांमध्ये निवडणुका पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!