Monday, July 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआजपासून घरगुती स्वयंपाकाच्या गॅस दरात वाढ..!

आजपासून घरगुती स्वयंपाकाच्या गॅस दरात वाढ..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पेट्रोल,डिझेल आणि व्यवसायिक गॅसच्या दरवाढीनंतर आता घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.सदरची दरवाढ ही आज,रविवार ७ जून २०२६ पासून लागू करण्यात आली आहे.यापूर्वी शनिवार ७ मार्च २०२६ रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती.७ मार्च पूर्वी गडचिरोली व इतर जिल्ह्यात मिळणारा घरगुती गॅस हा ९१८ रुपये होता.त्यानंतर,६० रुपये वाढताच ९७८ रुपये झाला.तर आता १४.२ किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत २९ रुपयांची वाढ करण्यात आल्याने तोच गॅस सिलेंडर १ हजार ७ रुपयाला मिळणार आहे.विशेषतः सिलिंडरच्या किंमती ह्या स्थानिक टॅक्सनुसार वेगवेगळ्या राहू शकतात.जागतिक स्तरावर वाढलेल्या खर्चाचा सामना करीत असलेल्या सरकारी इंधन कंपन्यांची गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ  असल्याने याचा फटका सर्वसामान्य जनतेच्या खिशाला बसणार आहे.विशेष म्हणजे,घरगुती गॅस हजार रुपयाच्या वर,तर व्यवसायिक गॅस सिलेंडर तीन हजार रुपयांच्या वर मिळणार असल्याने “काय करेल कास्तकार” अशी गावठी म्हण म्हणण्याची वेळ आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!