Monday, August 17, 2026
Homeजालनाअवैध वाळू भरलेला टिप्पर टिनाच्या शेडवर केला खाली; खाली झोपलेल्या ५ मजुरांचा...

अवैध वाळू भरलेला टिप्पर टिनाच्या शेडवर केला खाली; खाली झोपलेल्या ५ मजुरांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
जालना :-पुलाच्या बांधकामासाठी अवैध वाळू उपसा करून वाळू भरलेला टिप्पर टिनाच्या शेडवर टाकून खाली करण्यात आल्याने शेड खाली झोपलेल्या ५ मजुरांचा वाळू खाली दबून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार २२ फेब्रुवारीला पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात घडली.गणेश काशिनाथ धनवई वय ५१ वर्षे,रा.गोळेगाव,ता.सिल्लोड,भूषण गणेश धनवई वय १७ वर्षे,रा. गोळेगाव,ता.सिल्लोड,राजेंद्र दगडूबा वाघ वय ४१ वर्षे, रा.दहिद,ता.बुलढाणा,सुनील समाधान सपकाळ वय २० वर्षे,रा.पद्मावती,ता.भोकरदन जि.जालना,सुपडू आहेर वय ३९ वर्षे,रा.तोंडापूर, ता.जामनेर,जि.जळगाव अशी मृतकांची नावे आहेत.
माहितीनुसार,पासोडी शिवारामध्ये पुलाचे बांधकाम सुरू आहे.कामासाठी स्वस्त वाळू उपलब्ध व्हावी म्हणून कंत्राटदार रात्रीच्या सुमारास अवैध वाळू आणून टाकत होता.अशातच चालकाच्या निष्काळजीपणामुळे पाच जणांचा मृत्यू झाला.पुलाच्या बांधकामाच्या जवळच कामासाठी आलेल्या मजुरांनी वास्तव्यासाठी टिनाच्या पत्र्याचे शेड उभारले.मध्यरात्रीच्या सुमारास चालकाने निष्काळजीपणाने वाळूचा टिप्पर शेडवर रिकामा केला.त्यामुळे शेडमध्ये झोपलेले सहा जण वाळू खाली दबले गेले.सदरचा प्रकार शेड बाहेर झोपलेल्या महिलेच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केली.महिलेने आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना बोलावून आणले. त्यांनी वाळूचा ढिगारा हटवत सहा जणांना बाहेर काढले. यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला.तर एक १२ वर्षांच्या मुलीला वाचवण्यात यश आले आहे.घटनेची माहिती मिळताच जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!