Wednesday, August 12, 2026
Homeगडचिरोलीअवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. - देसाईगंज...

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई केली आहे.या प्रकरणात मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून,तहसीलदाराच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त,नागपूर यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
कोंढाळा येथील कोंढाळा-सिंड्राई घाट परिसरात  विलास महादेव ढकले वय अंदाजे ३६ वर्षे,रा.जुनी वडसा, ता.देसाईगंज,जि.गडचिरोली हे ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैध वाहतूक करत असतांना ट्रॅक्टर पलटी होऊन त्यांचा मृत्यू झाला होता.या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने जिल्हा भरारी पथकाची नियुक्ती करून घटनास्थळाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.
जिल्हा भरारी पथकाने केलेल्या स्थळ पाहणी अहवालासह उपविभागीय अधिकारी,देसाईगंज यांनी सादर केलेल्या अहवालानुसार,१० जून २०२६ नंतर संबंधित रेतीघाटावरील उत्खनन बंद करण्याचे स्पष्ट निर्देश असतांनाही त्या ठिकाणी अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले.तसेच या अवैध प्रकारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक महसूल यंत्रणेकडून अपेक्षित दक्षता घेण्यात आली नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.
या निष्कर्षांच्या आधारे संबंधित क्षेत्रातील महसूल अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. त्यानुसार मंडळ अधिकारी श्रीमती अर्चना टिचकुले 
आणि कोंढाळा साजाचे तलाठी मोहनदास ठाकरे यांना निलंबित करण्यात आले आहे.
याशिवाय,या प्रकरणातील प्रशासकीय जबाबदारी लक्षात घेऊन देसाईगंज तहसीलदार श्रीमती प्रिती डुडुलकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त,नागपूर यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.
  • अविश्यांत पंडा,जिल्हाधिकारी गडचिरोली👇
अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीस कोणतीही पाठीशी घालण्याची भूमिका स्वीकारली जाणार नाही. अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक सतर्कतेने काम करावे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन सेवार्थ प्रणाली लागू.. – ‘डेटा मायग्रेशन’ व पायलट वेतन देयक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन.. – सुट्टीच्या दिवशीही कोषागार...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाची प्रक्रिया अधिक वेगवान,सुलभ आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या १ जुलै २०२६ च्या शासन...

आता राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ला कायदेशीर संरक्षण प्राप्त.. -कोणत्याही शासकीय कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाईल..

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मंगळवारी 'राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण (सुधारणा)विधेयक २०२६' ला मंजुरी दिल्याने आता राष्ट्रीय गीत असलेल्या 'वंदे मातरम्'ला...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत पिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला.. – कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्याने सांगितला आनंददायक अनुभव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)योजनेअंतर्गत मी ३० पाईपची मागणी केली होती.पाईप खरेदी केल्यानंतर अवघ्या ८ दिवसांच्या आत माझ्या खात्यात ८०...

कारची ट्रकला मागून जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज,बुधवार १२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला; तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!